शेतकऱ्यांना पिक विमा मिळालाच पाहिजे – विवेक जाधव
शेतकऱ्यांना पिक विमा मिळालाच पाहिजे - विवेक जाधव
उदगीर (एल पी उगिले) : तालुक्यातील सोयाबीन पीक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना देखील पिक विमा मिळालेला नाही. उदगीर तालुक्यातील सोयाबीन पिकाचे नुकसान 80% झाल्याचे प्रशासनाने कबूल केले आहे. शिवाय पीक विम्याच्या संभाव्य रकमेच्या पंचवीस टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशा पद्धतीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले होते. मात्र दुर्दैवाने अद्याप अनेक शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. या संदर्भात शासन, प्रशासन पातळीवर योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी उदगीर तालुक्यातील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि संचालक मंडळांनी एका बैठकीत केली आहे. या बैठकीत बोलताना काँग्रेस पक्षाचे युवा नेते विवेक पंडितराव जाधव यांनी स्पष्ट केले की, लातूर जिल्ह्यात पिक विमा सर्वात कमी उदगीर तालुक्याला मिळाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले आहेत. तो पिक विमा आपण घेतल्याशिवाय राहणार नाहीत, त्यासाठी वाटलेच तर आंदोलन करावे लागेल. असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.
सदरील बैठक उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेनुसार लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांना रीतसर निवेदन देऊन पिक विमा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. सदरील विनंती पत्रावर गंगापूर भाकसखेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव, करवंदीचे शिवकुमार प्रभूआप्पा गुणगुर्ग, अण्णाराव पांडुरंग गंभीरे करवंदी, दयानंद शिवाजीराव रोडगे देवर्जन, कोणमारे मनमत मल्लिकार्जुन कवळखेड, पाटील बाळासाहेब शिवाजीराव गुरदाळ, पाटील शिवाजी किशनराव तोंडचिर, शिवराज भगवंतराव पाटील चिघळी, वीरभद्र माणिकराव पाटील कुमदाळ, केसगिरे वैजनाथ काशिनाथ उमरगा, लक्ष्मणराव मारुतीराव सोनवळे नळगीर, सुनील बालाजी कांबळे तोंडचिर, बापूराव माधवराव पाटील नावंदी, रामराव संभाजी पाटील देऊळवाडी, ज्ञानेश्वर बालाजी गायकवाड वायगाव, गंगाधर गोविंदराव बिरादार, धोंडीबा व्यंकटराव डावळे डाऊळ, संगमेश्वर सुभाष मिटकरी हेर, गणेश दामोदर शेटकर सुमठाणा, लक्ष्मण सदाशिव पटवारी लोणी, रमेश पंढरीनाथ भंडे दावणगाव, शिवाजी निडवंचे करडखेल, शेषेराव हेलगे लोहारा, ज्ञानेश्वर गंगाधर भांगे वाढवणा, वसंत आप्पाराव जाधव तोंडचिर, मंगेश वामनराव जाधव तोंडचिर, मोहन सोपानराव जाधव तोंडचिर, शिवराज नागशेट्टी विश्वनाथे रावणगाव, लालखान हुसेनखाँ पठाण धोंडीहिप्परगा, किशनराव माधवराव मोरे शेल्हाळ, तरवडे बालाजी धनराज वाढवणा, अशोकराव रामराव माने, हाळी इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी आपण भूमिका घेऊ अशा आश्वासन दिले.
