रेनबो पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी
रेनबो पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील आप्पाराव चौक देगलूर रोड येथील राधे- कृष्ण नगर येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या रेनबो पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी गुरुकुलचा देखावा सादर केला. सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा परिधान केली.या मध्ये गुरुच्या वेशभूषे मध्ये विहान सुरडकर ,युग पवार, शिष्यांच्या वेशभूषेमध्ये उर्वी सुर्यवंशी,अनवी ममदापूरे, आनंदी परकुटे, शरयु शेळके, आराध्या बिरादार, शरयू लोहकरे, संचेत नादरगे, शिवाई पाटील, जितू गुंडरे,शिवांश लोहकरे ,अन्वेषा गुणाले, ,शिवांश शेळके, आर्यन परकोटे , विराज पाटील ,रुद्र देवकते ,आरुष गवते ,रुद्र नादरगे ,शेळके शुभांगी श्री वल्ली चामले ,रियांश पाटील ,देवांश बिरादार, हितांश घुटके या विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या अनुराधा गुरमे, अश्विनी ममदापुरे, दिपाली परगे, मिताली ढेंगे ,शोभा लोढे मावशी यांनी परिश्रम घेतले.
