मुद्रांक विक्रेत्याकडून होणारी जनतेची लूट तात्काळ थांबवा – संतोष भोपळे

0
मुद्रांक विक्रेत्याकडून होणारी जनतेची लूट तात्काळ थांबवा - संतोष भोपळे

मुद्रांक विक्रेत्याकडून होणारी जनतेची लूट तात्काळ थांबवा - संतोष भोपळे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरात जुन्या तहसील कार्यालयाच्या समोर मुद्रांक विक्रेत्याकडून मुद्रांकाच्या मूळ दरापेक्षा जास्तीचे पैसे घेऊन, जनतेची लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागातून आलेले शेतकरी, विद्यार्थी आपल्या कामाच्या घाईत असतात, याचा गैरफायदा घेऊन मुद्रांक विक्रेते शंभर रुपयाचा मुद्रांक 120 रुपयाला,पाचशे रुपयाचा मुद्रांक 550 रुपयाला विक्री करत आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात अशी परिस्थिती नसून लातूर शहरात सुद्धा मूळ किमतीलाच मुद्रांक विक्री केली जाते, पण उदगीरला तो अधिकच्या भावाने विकला जात आहे. ही एक प्रकारे सर्वसामान्य माणसाची लूट असून त्याला प्रतिबंध करणे गरजेचे आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून मुद्रांक विक्रेत्याकडून जनतेची होत असलेली लूट तात्काळ थांबवावी, व अशा विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत अन्यथा या भ्रष्टाचाराच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन हाती घेईल. असा इशारा देणारे निवेदन महसूल प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष संतोष भोपळे, तालुका सचिव सुनील तोंडचिरकर, मनविसे शहर सचिव रोहीत बोईनवाड, संग्राम नागपुर्णे,विनोद चव्हाण, गायकवाड दयानंद, गायकवाड पंकज,केदार पुराणिक,शरद पुरवले, आदित्य पाटील, श्रीनिवास पाटील यादी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!