ग्रामपंचायत रुद्धाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्गदर्शन शिबिर संपन्न

0
ग्रामपंचायत रुद्धाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्गदर्शन शिबिर संपन्न

ग्रामपंचायत रुद्धाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्गदर्शन शिबिर संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील ग्रामपंचायत च्या वतीने दि 22 जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती मंजुषा लटपटे मॅडम उपविभागीय अधिकारी अहमदपूर, श्रीमती शोभा घोडके मॅडम महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अहमदपूर, श्रीमती अनुपमा पाटील मॅडम सुपरवायझर अंगणवाडी यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गावामध्ये वृक्ष लागवड करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना मंजुषा लटपटे मॅडम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या अडचणी, अर्ज कसा सादर करावा, अर्जामध्ये कोण कोणते कागदपत्रे अपलोड करावीत, अर्ज कोणती महिला करू शकते, अर्ज पात्र – अपात्र होण्याची कारणे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या शिबिराचे अध्यक्ष सरपंच गजानन चंदेवाड तसेच व्यासपीठावर उपसरपंच नाथराव केंद्रे, ग्रामसेवक किशोर सरकेलवाड, तलाठी कांबळे, मुख्याध्यापिका साके मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गावातील महिला, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश केंद्रे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!