इनर व्हील क्लब अहमदपूर चा पदग्रहण सोहळा संपन्न

0
इनर व्हील क्लब अहमदपूर चा पदग्रहण सोहळा संपन्न

इनर व्हील क्लब अहमदपूर चा पदग्रहण सोहळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील इनर व्हील क्लबचा पदग्रहण सोहळा दिनांक 22 रोजी बालाघाट तंत्रनिकेतन येथे संपन्न झाला.अध्यक्ष स्थानी विजया भुसारे- रोडगे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्षा लता शिवशंकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. वैष्णवी भुसारे यांनी स्वागत गीत म्हणून उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. मावळत्या अध्यक्षा शितल मालू यांनी नूतन अध्यक्षा विजया भुसारे यांना अध्यक्ष पदाचा पदभार दिला तर वर्षा मंदाडे यांनी रेखा बालूरे यांना सचिव पदाचा पदभार दिला. सविता भुतडा यांनी आयएसओ पदाचा पदभार सुनंदा पदासुरे यांना दिला वैशाली चामे यांनी कोषाध्यक्ष पदाचा पदभार सुरेखा उगिले यांना दिला.
2023 -24 या वर्षामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल क्लबला पाच ट्रॉफी व 12 प्रमाणपत्र मिळाले आहेत. यावेळी संपादक आशा तत्तापुरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चैतन्य बुलेटिनचे विमोचन करण्यात आले.
प्रमुख अतिथी लता शिवशंकर यांनी मार्गदर्शन करताना जीवनात आनंदी राहा.आरोग्याची काळजी घ्या असा मोलाचा संदेश दिला. अध्यक्षीय समारोप विजया भुसारे-रोडगे यांनी केला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल मालू यांनी केले सूत्रसंचालन आशा रोडगे, डॉ.वैष्णवी भुसारे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष पुजा रेड्डी यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस प्राचार्या रेखाताई हाके-तरडे, डॉ.अंजली उगिले, मीना भुतडा, सुनीता गुणाले, शैलजा सांगवीकर, प्राचार्या शोभा टोम्पे, कलावती भातांब्रे, मंजुषा फुलारी, डॉ.मीनाक्षी करकनाळे, डॉ.वर्षा भोसले या सर्व माजी अध्यक्षासह प्राचार्या सारिका उगिले,दर्शना हेंगणे, जयश्री देशमुख, आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका वृषाली चवळे, शिल्पा हंगरगे, शिवालिका हाके, संगीता मेनकुदळे, रत्नमाला कोडगिरे सह सर्व सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!