अहमदपूरातील साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 53 वी पुण्यतिथी साजरी

0
अहमदपूरातील साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 53 वी पुण्यतिथी साजरी

अहमदपूरातील साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 53 वी पुण्यतिथी साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील थोडगा रोड शिवनेरी शिवसेना कार्यालयामध्ये मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या वतीने लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 53 वी पुण्यतिथी उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्रातील थोर कवी, कादंबरीकार, लेखक, पोवाडे, संगीतकार, साहित्यिक, म्हणून समाजाला दिशादर्शक एक आदर्श महापुरुष म्हणून नवाजलेल्या लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 53 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या वतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली .यावेळी तालुका अध्यक्ष सुभाष गुंडीले तर उपाध्यक्ष सोमनाथ जिवारे यावेळी ज्येष्ठ मास चे सल्लागार मधुकर ईबीद्रे तर अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तर यानंतर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले मुकुंद बालाजी वाघमारे यांचा यावेळी सत्कार करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान अहमदपूर आगारातील अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष मधुकर इबिद्रे यांचाही यावेळी सन्मान करून शुभेच्छा देण्यात आले. यावेळी , मधुकर सूर्यवंशी,संतोष सूर्यवंशी, सरपंच शिवाजी तरूडे, प्रदीप गुंडाळे, दत्त हरगीले , हैबती हरगीले,सुनील हरगीले , प्रदीप ईबिद्रे, वाघमारे किनीकर, संभाजी गुंडीले,मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे पदाधिकारी व तालुक्यातील समाज बांधव यावेळी उपस्थित होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!