हरित अहमदपूर उपक्रमांतर्गत प्रशासनाच्या वतीने यशवंत विद्यायातून वृक्षदिंडी चे आयोजन

0
हरित अहमदपूर उपक्रमांतर्गत प्रशासनाच्या वतीने यशवंत विद्यायातून वृक्षदिंडी चे आयोजन

हरित अहमदपूर उपक्रमांतर्गत प्रशासनाच्या वतीने यशवंत विद्यायातून वृक्षदिंडी चे आयोजन

(5000 वृक्षाचे मोफत वितरण,दुर्मिळ वृक्षांची ओळख,वृक्ष प्रदर्शन व विक्रीचे आयोजन)

अहमदपूर (गोविंद काळे) : हरित अहमदपूर उपक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित कार्यक्रमात तालुका प्रशासन व सामाजिक संस्थेच्या सहभागाने वृक्षदिंडी व मोफत वृक्षाचे वाटप करण्यात आले. यशवंत विद्यालयातून वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आझाद चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सावरकर चौक मार्गे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आले. यावेळी यशवंत विद्यालयातील स्काऊट गाईड चे बँड पथक सह कोटा पॅटर्नचे विद्यार्थी यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने यात सहभाग नोंदवून वृक्ष लागवडीसाठी घोषणा दिल्या.विविध घोषवाक्यातून संदेश देण्यात आले.
प्रशासनाच्या वतीने नगरपरिषद सामाजिक वनीकरण वन विभाग व कृषी विभागाच्या वतीने विविध वृक्षांचे स्टॉल लावण्यात आले. होते वृक्ष लागवडी संबंधी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. या स्टॉलवर परसबागेमध्ये लावणारे ,झाडे फळझाडे ,फुलझाडे यांचा समावेश होता.तीन नर्सरीने सुद्धा याच सहभाग नोंदवला. उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे ,तहसीलदार शिवाजी पालेपाड ,उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर,
गट विकास अधिकारी अमोल आंदेलवाड,नगरपरिषदचे मुख्याधिकारी अजय नराळे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे वनपाल गोविंद माळी,विठ्ठल देवकते,वनरक्षक विश्वनाथ होनराव,
एपीआय करीम पठाण, पीएसआय रमेश आलापुरे,नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, अभिलाष जगताप,मुनवर मुजावर,गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड,केंद्रप्रमुख दयानंद मठपती, केंद्रीय मुख्याध्यापक दत्ता गुरमे,मंडळ अधिकारी विशाल केंद्रे यशवंत विद्यालयाचे प्राचार्य गजानन शिंदे ,पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वंभर स्वामी डॉ सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजकुमार कल्याणी वृक्ष मित्र अनिल चवळे कला शिक्षक महादेव खळुरे, स्काऊट मास्टर सुनील स्वामी ,एनसीसी विभाग प्रमुख गौरव चवंडा कोटा पँटर्नचे खय्युम शेख सह नगरपरिषद पंचायत समिती ,तहसील कार्यालय ,कृषी विभाग ,वन विभाग सामाजिक वनीकरण व्यापारी मित्र मंडळ वृक्ष संवर्धन मंडळाचे शेकडो स्वयंसेवक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ===========चौकट.

=वृक्ष लागवडीवरून संवर्धन ही करा. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी नागरिकांना दिलेल्या वृक्षाचे रोपण करावे व त्याबरोबरच त्याचे संवर्धनही करावे नगरपरिषदेने शहराच्या दुतर्फा सावली असणारे वृक्ष लागवड करून त्याच्या संवर्धन करावे असे आव्हान केले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!