50 किलोमीटर रनिंग करून साजरा केला रनर सदस्याचा पन्नासावा वाढदिवस

0
50 किलोमीटर रनिंग करून साजरा केला रनर सदस्याचा पन्नासावा वाढदिवस

50 किलोमीटर रनिंग करून साजरा केला रनर सदस्याचा पन्नासावा वाढदिवस

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात अहमदपूर रनर्स ग्रुप गेले दहा वर्षापासून कार्यरत असून या रनिंग ग्रुपची सुरुवात दहा वर्षांपूर्वी सात सदस्या पासून होऊन आज या रनिंग ग्रुपमधून जवळपास 100 सदस्य आहेत महाराष्ट्रातल्या विविध 50 पेक्षा जास्त मॅरेथॉनमध्ये या ग्रुपच्या सदस्यांनी रनिंग मध्ये सहभाग घेऊन पदक पटकावलेले आहेत. अशा या रनिंग ग्रुपचे संस्थापक सदस्य नामदेव बरुरे यांचा पन्नासावा वाढदिवस रनिंग ग्रुपच्या सदस्यानी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करताना क्लबच्या 50 सदस्यांनी 50 किलोमीटर रनिंग करून हा वाढदिवस साजरा केला आहे.
यामध्ये स्वतः नामदेव बरुरे यांच्यासहित पन्नास सदस्यांनी रात्री दोन वाजता या रनिंगला सुरुवात केली व पन्नास किलोमीटर रनिंग त्यांनी पाच तास 47 मिनिटे सतत धावल्यानंतर पूर्ण केली व अहमदपूर तालुक्यातील सर्वांना रन फॉर हेल्थ चा संदेश देत चांगल्या आरोग्यासाठी किमान दररोज पाच किलोमीटर तरी धावले पाहिजे किंवा चालले पाहिजे असा हा संदेश दिला.

या रनर ग्रुपच्या सदस्यांनी आतापर्यंत सिंहगड राजगड तोरणा मॅरेथॉन ,सातारा हिल्स मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन ,हैदराबाद इंटरनॅशनल मॅरेथॉन अशा नामांकित मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन पदके पटकावलेले आहेत.
गेले दहा वर्षे ही आरोग्य चळवळ अहमदपूर आणि परिसरात चालू असून चांगल्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम करणे किंवा चालणे किंवा धावणे हे गरजेचे आहे असे यावेळी 50 वर्ष वय असलेले नामदेव बरुरे यांनी स्वतः धावून समाजापुढे एक वेगळाआदर्श ठेवला आहे.
या रनर्स ग्रुपच्या सर्व आयोजन व संयोजनामध्ये ग्रुपचे सदस्य भरत इगे ,संतोष भुरे, वेदांत राठोड ,नामदेव बरुरे, धनंजय तोकले ,दीपक वलसे , लुल्ला शेख, बैकरे सर ,अजब सिंग डॉक्टर गणेश कदम , संजय सरकाळे तुकाराम उगिले ,डॉक्टर अमृत चिवडे ,शिवाजी चोथवे, डॉक्टर स्वामी अक्षय मलवाड, श्रीराम फासगे यांच्यासह सर्व सदस्य वर्षभर कार्य करत असतात.

कोट

गेल्या दहा वर्षांपासून मी सतत धावत असून शरीर आता त्यानुसार कार्य करत आहे.
माझ्या पन्नासावा वाढदिवसानिमित्त रनर्स ग्रुप च्या सदस्यांनी 50 किलोमीटर धावण्याचा संकल्प केला व तो आम्ही पाच तास 47 मिनिटात पूर्ण केला.
चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकानेच व्यायाम करणे , धावणे ,चालणे हे गरजेचे आहे किमान दररोज अर्धा ,पाऊण तास तरी व्यायाम केला पाहिजे त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील.

नामदेव बरुरे
सदस्य रनर्स ग्रुप अहमदपूर.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!