मन्याड नदीला पुर ! सुनेगाव ( शेंद्री) चा रस्ता,पुल गेला पुराच्या पाण्याखाली ;गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला
मन्याड नदीला पुर ! सुनेगाव ( शेंद्री) चा रस्ता,पुल गेला पुराच्या पाण्याखाली ;गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सुनेगाव (शेंद्री) या गावाला जाणारा रस्ता व मन्याड नदीवर बांधलेला पुल गेल्या काही दिवसापासुन सतत पडत असलेल्या अतिवृष्टीने मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे पाण्य खाली गेला आहे सध्या तरी या गावाला जाणारा मुख्य रस्ता व पुल पाण्याखाली गेल्याने वृध्द नागरीक, शाळकरी मुले, शेतकरी, महीला व्यापारी तसेच गावकऱ्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे
याविषयी ग्रामस्थांकडून समजलेली अधिकृत माहीती अशी की, तत्कालीन आमदार बब्रुवान खंदाडे यांनी सुनेगाव ( शेंद्री) या गावातील नागरीकांना , शाळकरी मुले , महीला व शेतकऱ्यांना अहमदपूर या तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे आणी ग्रामस्थांच्या अनेक वर्षाच्या मागणीचा विचार करुन साधारणतहा सन २००८ ला पुलाचे काम पुर्णत्वास नेले .परंतु पुलाच्या दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांनी रस्ता तयार करण्यास असमर्थता दर्शवल्याने रस्त्याचे काम झाले नाही. तसेच पुलाची उंची उत्यंत कमी असल्यामुळे आणी पुल्याच्या दोन्ही बाजुंना रस्त्याचा आधार नसल्यामुळे सन २०१६ साली झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे सदरील पुल वाहुन गेला होता
या संदर्भात ग्रामस्थांनी सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीवर पुलाचे काम व पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिस्कार टाकुन तो शंभर टक्के यशस्वी ही केला तद्नंतर प्रशासनाने गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतुन पुलाच्या दोन्ही बाजुस कच्चा रस्ता तयार केला .परंतु प्रत्येक पावसाळ्यात नदीला पुर आला की पुलाच्या बाजुचा रस्ता वाहुन जात आहे. या त्रासाला कंटाळून पुन्हा एकदा सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहीस्कार टाकला तोही शंभर टक्के यशस्वी केला तेव्हा पासुन आज तागायत या पुलाची शासनाकडून दुरुस्ती झालेली नसून ग्रामस्थच प्रत्येक वर्षी वर्गणी गोळा करून दगड, गोटे, मुरूम टाकुन वाहतुकीचा प्रश्न सोडवत आहेत . असे गावातील नागरीक गोविंद काळे यांनी सांगीतले
तसेच गेल्या काही दिवसापासुन सतत पडत असेलेल्या संतत धार पावसामुळे मन्याड नदीला पुर आला असुन तालुक्याशी गावाला जोडणारा रस्ता तसेच उंची कमी असलेला पुल पुर्णतहा: पाण्याखाली गेला असुन वृध्द नागरीक,महीला , शाळकरी मुले, व्यापारी, शेतकरी तसेच संपुर्ण गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे मन्याड नदीवरील पुल व रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे पुल व रस्ता वाहुन गेला आहे की नाही हे पुराचे पाणी कमी झाल्यासच कळणार आहे
या संदर्भात ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना, प्रशासनाला निवेदने दिली . लाक्षणिक उपोषण ही केले परंतु अद्यापही पक्का रस्ता आणि पुलाचे बांधकाम झाले नाही . तरी लवकरात लवकर रस्ता व पुलाचे काम करावे अशी मागणी सरपंच उषा गोपीनाथ जायभाये तसेच सुनेगाव ( शेंद्री)चे ग्रामस्थांनी केली आहे
चौकट : – सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहीस्कार टाकल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गावकऱ्यांशी स्व:ताहा संवाद साधुन गावकऱ्यांची पुलाची व रस्त्याची मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते अशी माहीती ग्रामस्थांनी दिली.
