राष्ट्रीय धोरण कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी हाश्मी यांची भेट

0
राष्ट्रीय धोरण कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी हाश्मी यांची भेट

राष्ट्रीय धोरण कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी हाश्मी यांची भेट

उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभर शिक्षण सप्ताह कार्यक्रम राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूल येथे विविध उपक्रम राबवत असलेल्या शिक्षण सप्ताह 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या कार्यक्रमाला लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी बि.के हाश्मी यांनी अचानक धावती भेट देऊन कार्यक्रमाला उपस्थिती लावली, व राबवत असलेला उपक्रम पाहून त्यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राम ढगे, उपमुख्याध्यापक बी.बी नागरवाड, परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील, पर्यवेक्षक अविनाश पोशेट्टी, शिक्षण सप्ताह कार्यक्रम नियोजन प्रमुख तथा कलाशिक्षक एन.आर जवळे यांच्यासह विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!