राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र च्या वतीने महाराष्ट्रद्वेषी अर्थसंकल्प निषेध आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र च्या वतीने महाराष्ट्रद्वेषी अर्थसंकल्प निषेध आंदोलन
लातूर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बुधवारी सकाळी लातूर शहरातील गांधी चौकात केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्वेषी अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात लाक्षणिक आंदोलन करून केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्वेषी अर्थसंकल्पाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपाचा दारुण पराभव केल्याने, केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केला. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय केला असून त्याचा रोष राज्यातील जनता आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवून देईल असे सांगितले.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांनी यावेळी बोलताना म्हणाले की, देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्रावर केंद्राने अर्थसंकल्पात अन्याय केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर लावण्यात आलेल्या जाचक १८ टक्के जीएसटीचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध केला जात असल्याचे सांगून यांनी महाराष्ट्राच्या तुलनेत केंद्राला कमी महसुली उत्पन्न देणाऱ्या बिहार,आंध्र प्रदेशाला जास्तीचा निधी उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्रद्वेषी केंद्र सरकारने आपली ही चूक सुधारावी. अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव मदन काळे, जिल्हा कार्याध्यक्ष रशिद शेख व बापूसाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ कुचेकर, प्रदेश सचिव दत्तात्रय काकडे, लातूर तालुकाध्यक्ष बक्तावर बागवान, औसा तालुकाध्यक्ष शाम आबा पाटील, रेणापुर तालुकाध्यक्ष बालाजी कदम, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष निशांत वाघमारे, जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी, औसा विधानसभा अध्यक्ष ॲड. यशवंत भोसले, औसा शहराध्यक्ष सनाऊला शेख, रेणापूर शहराध्यक्ष सय्यद मुस्तफा, पाशा फरीद, एस. के. देशमुख, पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अंजली पाटिल, जिल्हा सचिव सौ. विजया मलशेट्टी, जिल्हा सचिव ॲड. नारायण नागरगोजे, लीगल सेल चे जिल्ह्ध्यक्ष ॲड.आशिष चव्हाण, जिल्हा सचिव सतिश बिराजदार, हमीद भाई शेख, युवक कॉंग्रेस चे प्रदेश सचिव ॲड इरफान शेख, लातूर शहर विधानसभा अध्यक्ष ॲड. शेखर हविले, उस्मान शेख, डी. उमाकांत, ईरण्णा पावले, फरीद शेख, फेरोजखान पठाण, अजहर शेख, राहुल ढाले, युवक कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण साळुंके, सलीम घंटे, अल्पसंख्यांक चे प्रदेश सचिव इरफान शेख, ॲड. विनायक शिंदे, तुषार मुचवाड, युवती च्या शहर जिल्हाध्यक्षा कल्पना फरकांडे, राजकुमार जोशी, मोईन पटेल, आकाश कांबळे, सहदेव खरटमोल, वैद्यकीय सेल चे प्रदेश सचिव सत्यजीत गव्हाणे, तोसिफ शेख, शाहरुख पठाण, युवक विधानसभा अध्यक्ष आदर्श उपाध्ये, शम्मू सय्यद, जाकेर तांबोळी यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
