शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन

0
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन

उदगीर (एल.पी.उगीले) : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जावी या मागणीसाठी उदगीर तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. देशात कोणीही उपाशीपोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे, यासाठी ऊन, पाऊस, थंडी, वादळी वारा, याचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेती करणे थांबविल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होईल. शेतकरी जगेल तरच जग जगेल. असे त्रिकालाबाधित सत्य असताना देखील केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने, शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केलेली नाही. म्हणून उदगीर तालुका काँग्रेसच्या वतीने उदगीर तहसीलदार यांना तालुक्यातील, राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ व्हावी, यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, महिला जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील, काँग्रेस नेत्या उषाताई कांबळे, शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, चंद्रप्रकाश खटके, संतोष बिरादार, दत्ता सुरनर, संतोष वळसणे, आलिम पाटील, संजय पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबा गोडभरले, श्रीनिवास एकुरकेकर, लक्ष्मण नारागुडे, पंडित नाना ढगे, बबन धनबा, डॉ. गोविंदराव सोनकांबळे, आशिष पाटील राजूरकर, नितीन गुंडरे, शिवराज पाटील, भगवान बच्चेवार, विपिन जाधव, विलास शिंदे, महबूब शेख, श्रीकांत पाटील, फैयाज डांगे, सोनू पिंपरे, कनिष्क शिंदे, परमेश्वर अडगुलवाड, माधव कांबळे, प्रीतम गोखले, सांगवीकर गुंडाजी, मंगेश कुमार हेरकर, राजेश्वर भाटे, बाळासाहेब जाधव इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक काँग्रेसजण उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!