शास्त्री प्राथमिक विद्यालयात कारगिल विजय दिन साजरा

0
शास्त्री प्राथमिक विद्यालयात कारगिल विजय दिन साजरा

शास्त्री प्राथमिक विद्यालयात कारगिल विजय दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात १९९९ साली कारगिल युध्दात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते कारगिल युध्दात शहीद झालेले लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी शहीद कॅप्टन कृष्णकांत यांच्या प्रतिमेचे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी १९९९ साली भारताच्या सैनिकांनी कारगिल युध्दात शौर्य गाजवून विजय प्राप्त केला होता.यात अनेक सैनिक शहीद झाले होते.त्यांची शौर्यगाथा आपण सदैव लक्षात ठेवली पाहिजे.कारगिल विजय दिवसाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी कारगिल युद्धात शहीद झालेले आपल्याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेले शहीद कॅप्टन कृष्णकांत यांनी रजेवर असताना युद्धात सहभागी होऊन शत्रूशी लढता लढता भारतमाते साठी वीरमरण पत्करले.त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही देशसेवेसाठी सदैव तत्पर रहावे, असे आवाहन केले.कारगिल युद्धात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!