नागतिर्थवाडी शाळा समिती अध्यक्षाची बिनविरोध निवड

0
नागतिर्थवाडी शाळा समिती अध्यक्षाची बिनविरोध निवड

नागतिर्थवाडी शाळा समिती अध्यक्षाची बिनविरोध निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : मौजे नागतिर्थवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीची दोन वर्षा नंतर फेरनिवड आयोजित केली होती. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्याची बिनविरोध निवड करण्यात आली. यामधे प्रवीण तुकाराम कासले यांची अध्यक्ष तर अनुराधा रामकिसन बुगे यांची उपाध्यक्ष पदी आणि सर्व सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सर्व सदस्य तसेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख राज गुणाले यांच्या हस्ते शाल व हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी गावच्या सरपंच सौ कोमल राज गुणाले, माजी सरपंच राज गुणाले, माजी शाळा समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंबडे, ग्रा. प. सदस्य भरत पेटे, स्वाती कासले, योगेश कासले, राजू शेल्हाळे, मुख्याध्यापक अश्विनीकुमार गुंजरगे, सहशिक्षिका आम्रजा शिरुरे यांच्या सह पालक उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या निर्देशाने सर्व शाळा मध्ये शिक्षण सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा नागतिर्थवाडी येथे सांस्कृतिक दिन आणि स्नेहभोज दिन विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून व विविध खाद्य पदार्थ घरून बनवून घेवून येवून शाळेत सर्वांनी एकत्रित स्नेह भोजन करून साजरा केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!