मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून एक ही महिला वंचितू राहू नये याची काळजी घ्यावी – आमदार बाबासाहेब पाटील

0
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून एक ही महिला वंचितू राहू नये याची काळजी घ्यावी - आमदार बाबासाहेब पाटील

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून एक ही महिला वंचितू राहू नये याची काळजी घ्यावी - आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील शिरुर ताजबंद येथे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ नोंदणी कॅम्प शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महीलांना मिळाला पाहीजेत लाभापासून एकही महीला वंचित राहणार नाही याची काळजी घ्या असे आवाहान आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी मंजूषा लटपटे , तहसीलदार शिवाजीराव पालेपाड, गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड,,बाल प्रकल्प अधिकारी शोभा घोडके, राष्ट्रवादी काॅग्रेस जिल्हा सरचिटणीस शिवानंद हेंगणे, शिवाजी देशमुख,सरपंच मच्छिन्द्र वाघमारे, उपसरपंच सुरजभैय्या पाटील,विश्वनाथप्पा भुरे,चेअरमन चंद्रकांत गंगथडे,तान्हाजी राजे,ग्रामपंचायत सदस्य किशन कापसे, अनिलभाऊ लामतुरे, शुभम सारोळे, रामेश्वर येनुरे उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पाटील यांनी उपस्थित मंडळ अधिकारी, बँकेचै शाखाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, अंगणवाडीताई, आशाताई यांना मार्गदर्शन करताना बँकेने खाते फार्म दाखल करताच तात्काळ खाते काढून द्यावे,तर महसुल व ग्रामसेवकांनी दररोज गावात जावे कांही अडचणी आहेत का पहावे उगीच माझ्याकडे तीन चार गावे आहेत मी त्या गावाला होतो असे सांगून चालणार नाही .मला कोणत्याही गावातून ग्रामस्थांची तक्रार आली नाही पाहीजे गटविकास अधिकार्‍यांनी काळजी घ्यावी.अंगवाडी कार्सकर्ती ,आशाताई यांनी घरोघर जावून पात्र सर्व महिलांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत एकही महिला लाभापासून वंचित राहू नये.असे आमदार पाटील यांनी सांगीतले.
कार्यक्रमास मंडळ अधिकारी, बँकेचे ग्रामसेवक ,तलाठी, कृषी अधिकारी अंगणवाडी ताई, आशा वर्कर, महिला – भगिनी उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मा सरवदे यांनी तर आभार सरपंच मच्छिंद्र वाघमारे यांनी केले.

अहमदपूर तालुका गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड फोन उचलत नसल्याची तक्रार उपस्थित नागरिकांनी केली .जसा अधिकारी तसेच गावोगावचे ग्रामसेवक आहेत फक्त फोनवरुन संरपंचाच्या संपर्कात असतात गावी येतच नाहीत अहमदपूरात राहून कारभार हाकतात अशा तक्रारी नागरिकांनी यावेळी आमदार पाटील यांना सांगीतल्या.यावेळी आमदार पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारी येवू नये असे गटविकास अधिकार्‍यांना बजावले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!