शिरूर ताजबंद बसस्थानकासाठी साडे सहा कोटींचा निधी मंजूर

0
शिरूर ताजबंद बसस्थानकासाठी साडे सहा कोटींचा निधी मंजूर

शिरूर ताजबंद बसस्थानकासाठी साडे सहा कोटींचा निधी मंजूर

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील शिरुर ताजबंद बसस्थानकातील सोयी सुविधा निर्माण करणे आणि बांधकासाठी ६ कोटी ५० लाख ३६ हजार रुपयांचा निधी आ. बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाला आहे.

अहमदपूर तालुक्यातील शिरुर हे ताजबंद महत्वाचे बसस्थानक असून या बसस्थानकातून महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक व आंध्रप्रदेश येथे जाण्यासाठी प्रवाशी मोठ्याप्रमाणात येतात. प्रवाशांची गरज ओळखून तत्कालीन दुग्धविकास, ग्रामविकास व परिवहन राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी बसस्थानक मंजूर करुन स्थानक उभारले होते. त्यावेळेही ते प्रवाशांच्या सोयीचे बनले होते. बसस्थानकात बुक स्टॉल, फळे स्टॉल, चहा पाण्याची व्यवस्थासह कोणत्याही प्रकारच्या स्टॉलचे बांधकाम झालेले नव्हते. महत्वाचे व गावातील बसस्थानक असल्याने गावाची गरज प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शिरुर ताजबंद व परिसरातील उमरगा यल्लादेवी, माकणी, चोबळी, आजनी, सलगरा, मेथी, मुळकी, उबंरंगा, आंबेगाव, सय्यदपूर, बोडका परिसरातील नागरिकांची मागणी होती. नागरिकांच्या मागणीचा विचार करुन बसस्थानकात विविध स्टॉल बांधकामासाठी निधी मंजूर करुन आणल्याची माहिती अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!