कारगिल विजय दिन उत्साहात साजरा..! सम्राट मित्र मंडळाचा पुढाकार

0
कारगिल विजय दिन उत्साहात साजरा..! सम्राट मित्र मंडळाचा पुढाकार

कारगिल विजय दिन उत्साहात साजरा..! सम्राट मित्र मंडळाचा पुढाकार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कारगिल विजय दिन अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला अमर जवान च्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.त्यानंतर उपस्थित नागरिकांकडून मेणबत्ती प्रज्वलित करून शहिद वीर जवानांना सामूहिक पणे अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी करून कारगिल विजयाचा हा उत्साह करत असताना सैन्यातील जवान आणी त्यांच्या परिवाराबद्दल सर्वांनी कायम कृतज्ञेतेची भावना ठेवली पाहिजे असं अवाहन केले.
या कार्यक्रमासाठी बालाजी पाटील चाकूरकर,अहमदपूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रवी बुरकूले, पोलिस उपनिरीक्षक अलापूरे, माजी सभापती बाळासाहेब गूट्टे, कुलदीपभैय्या हाके पाटील,शरद बनसोडे, अँड.सुभाषराव सोनकांबळे, अण्णाराव सूर्यवंशी,सुभेदार मेजर विठ्ठलराव शिंदे,नायक हरिहर सोनवणे,नायक हनुमंत मुंडे,कॅप्टन दोडे गणपत,सुभेदार मेजर शिवाजी नलवाड,मेजर बी. एन.कराड,नायक सुभेदार दत्ता गायकवाड,कॅप्टन माधव शिरसाठ,सुभेदार अंकुश डुरे,जिलानी जब्बार,संपत दहिफळे, सुभेदार मेजर वसंत मरवले, मेजर उद्धव मुंडे,मेजर पी.एन,शिवराम शिरसाठ, जायभाये विष्णू आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित सेवानिवृत्त सैनिकांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पत्रकार मारुती बुद्रुक पाटील यांनी केले तर आभार सचिन बानाटे यांनी मानले.राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार अजय भालेराव,भीमराव कांबळे, पत्रकार त्रिशरण मोहगावकर, पत्रकार गणेश मुंडे,पत्रकार विलास चापोलीकर, संविधान कदम,सतीश लांडगे, शुभंम नावंदे, आकाश वाघमारे, राज मतकर,जैनू सोनकांबळे आदींनी पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!