सततच्या पावसाने पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

0
सततच्या पावसाने पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

सततच्या पावसाने पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

अहमदपूर (गोविंद काळे) : गेल्या काही दिवसापासून अहमदपुर तालुक्यातील खंडळी परिसरात सतत चा पाऊस होत असून यामुळे पिके बाहरली आहेत. पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु मूग, कापुस, सोयाबीन आदी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात सोयाबीन,कापूस, तूर, मूग, उडीद आदी पीके घेतले जातात. यावर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झाली असल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण होते. पाऊस पाणी चांगले झाले असल्याने पिके बहरात होती. मात्र गेल्या काही दिवसापासून सतत होत असलेला पाऊस यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी थोडीशी पावसाने उघडीप देताच फवारणी करतानाचे दिसून येत आहे.

चौकट : दररोज होत असलेल्या पावसामुळे पिकात तणाचे प्रमाण वाढले आहे. मजुराचा अपुऱ्या पुरवठा मुळे शेतकरी तणनाशकाची फवारणी करून तन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!