पळवून नेलेल्या 3 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात लातूर पोलिसांना यश

0
पळवून नेलेल्या 3 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात लातूर पोलिसांना यश

पळवून नेलेल्या 3 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात लातूर पोलिसांना यश

उदगीर ग्रामीण पोलिसांच्या अपयशावर विशेष पथकाकडून पांघरून

लातूर (एल.पी.उगीले) : १७ वर्षीय २ अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळून नेले बाबत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन व निलंगा पोलीस स्टेशन येथे २ तक्रारी दाखल होत्या. मागील १ वर्षापेक्षा जास्त कालावधीत पोलीस स्टेशन कडून संबंधित मुलींचा शोध सुरू होता. तसेच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळून नेले बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त होती.
वरील पोलीस स्टेशनला दाखल तक्रारीबाबत पोलीस स्टेशन सह विशेष पथकाकडून समांतर तपास करण्यात येत होता.
गुप्त व तांत्रिक माहिती संकलन व विश्लेषणाचे आधारे AHTU च्या टीमने अल्पवयीन मुलींचा हैदराबाद व नांदेड येथे शोध घेण्यात यश आले.
AHTU च्या पथकाने २ दिवस हैदराबाद शहरात मुक्काम करून २ अल्पवयीन मुली व त्यांचे सोबत २ आरोपींना ताब्यात घेतले. तर एका अल्पवयीन मुलीस वांगी ता जि नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले. मिळून आलेल्या मुली व आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले
AHTU च्या पथकाने मागील दीड महिन्यांपासून शोध मोहीम राबवून लातूर जिल्ह्यातून पळवून नेलेल्या १० अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे.
सदरची कामगिरी सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर व अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री दयानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, एस एस सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक, पोलिस अमलदार श्री सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला अंमलदार वंगे व लता गिरी, चालक मणियार या AHTU च्या पथकाने पार पाडली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!