“उपमुख्यमंत्री नारीशक्ती सन्मान 2024″ने नीता मोरे सन्मानित

0
"उपमुख्यमंत्री नारीशक्ती सन्मान 2024"ने नीता मोरे सन्मानित

"उपमुख्यमंत्री नारीशक्ती सन्मान 2024"ने नीता मोरे सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले) :सन्मान कर्तुत्वाचा, सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवक व बंदरे, मंत्री संजयभाऊ बनसोडे यांच्या शुभहस्ते हा उपमुख्यमंत्री नारीशक्ती सन्मान 2024 हा पुरस्कार उपक्रमशील शिक्षिका निता मोरे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अफसरबाबा शेख, अभिजीत औटे, ऍड. दिपाली औटे, मधुमती कनशेट्टे हे उपस्थित होते.
त्यांच्या या यशाबद्दल लाल बहादुर शास्त्री माध्यमिक स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, केंद्रीय समितीचे सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे, माध्यमिक शालेय समितीचे कार्यवाह सतनप्पा हुरदळे, माध्यमिकचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, प्राथमिकचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, उपमुख्याध्यापक अरुण पत्की, पर्यवेक्षक माधव मठवाले यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!