नगर परिषदेचे कर्मचारी म्हणजे शहराची लाईफ लाईन : ना. संजय बनसोडे

0
नगर परिषदेचे कर्मचारी म्हणजे शहराची लाईफ लाईन : ना. संजय बनसोडे

नगर परिषदेचे कर्मचारी म्हणजे शहराची लाईफ लाईन : ना. संजय बनसोडे

सफाई कर्मचारीच खरे देवदूत

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये नगर परिषदेचे कर्मचारी काम करत असतात, खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टांमुळेच उदगीर शहर स्वच्छ असते. म्हणूनच आपण सफाई कर्मचा-यांना आपल्या शहराची लाईफ लाईन समजतो, आपले सफाई कर्मचारीच खरे देवदूत असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते शहरातील अग्निशामक दलाच्या फायर बुलेटचा लोकार्पण सोहळा व नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रेनकोट व महिलांना साडी वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व्यंकटराव बेद्रे, माजी पाणीपुरवठा सभापती अनिल मुदाळे, इब्राहिम देवर्जनकर, एस.एस. कटके , फय्याज शेख, राजकुमार चव्हाण, अग्निशामक विभाग प्रमुख विशाल अल्टे, उमाकांत गंडारे, सचिन स्वामी, सतिश कांबळे, सुरेश उप्परबावडे, नाशिर सय्यद, विनोद रंगवाळ, सुमनबाई सुतार, अमित सुतार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. संजय बनसोडे यांनी, भर पावसात आपले कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये १२ -१२ तास काम करत असतात, पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून माजी नगरसेवक अनिल मुदाळे यांच्या पुढाकाराने 250 कर्मचाऱ्यांना रेनकोट तर महिला कर्मचाऱ्यांना साडीचे वाटप आपण करत आहोत. मात्र पुढील काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण स्वतः लक्ष देऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून निधीची मागणी करणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.
उदगीर शहराची वाटचाल ही जिल्ह्याच्या दिशेने असून भविष्यात उदगीर जिल्हा होणार या दृष्टीनेच आपण शहरातील पायाभूत सुविधा उपलब्ध करत आहोत. मागील काळात हजारो कोटींचा निधी उपलब्ध करुन देवुन उदगीर मतदारसंघाचा कायापालट केला. उदगीर नगर परिषदेच्या वतीने हद्द वाढीचा प्रस्ताव प्रलंबित होता, तो ही मागील काळात आपण स्वतः लक्ष देऊन नगरपालिकेची हद्द वाढवली. मागील पाच वर्ष मी आपला जनसेवक म्हणून कार्य केले आहे. त्यामुळेच आपले उदगीर बदलेले दिसतेय. भविष्यकाळात आपण सर्वजण विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाल, अशी आशा ना. बनसोडे यांनी व्यक्त केली.
शहरात एखाद्या ठिकाणी आग लागली तर आपल्याकडे अग्निशामक दलाचे वाहन आहे, मात्र ज्या ठिकाणी मोठे वाहन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी आपली फायर बुलेट जाऊन अगदी गल्लीबोळातली सुद्धा आग आटोक्यात आणण्याचे काम आपले हे अग्निशामक दलाचे जवान करतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी नगर परिषदेचे कंत्राटी कर्मचारी अग्निशामक दलाचे जवान व विविध विभागातील प्रमुख व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!