नगर पालीका पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार ;पाण्याची पाईप लाईन सोडून दुसरी कडेच खड्डे अंदाज चुकल्याने रस्त्याची चाळण
नगर पालीका पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार ;पाण्याची पाईप लाईन सोडून दुसरी कडेच खड्डे अंदाज चुकल्याने रस्त्याची चाळण
अहमदपूर (गोविंद काळे) : नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच असुन शहरातील भाग्यनगर व सुफ्यान कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कंट्रोल वॉल बसवण्यासाठी पाईप लाईनचा अंदाज न आल्यामुळे पक्का रस्ता फोडण्यात आला तो पण हात भर खड्डा खोदण्या ऐवजी अक्षरशहा : पाच फुट खड्डा खोदुन रस्त्याची चाळणी करुन वाट लावली आहे यावरून असे निदर्शनात येते न. पा पाणी पुरवठा विभागाकडून तज्ञ व्यक्तीकडून पाईप लाईनचा अंदाज न घेता कुठल्यातरी खड्डे खोदणाऱ्या मजुरा कडून खड्डे खोदल्यामुळे पाईप लाईन एकीकडे तर खड्डे दुसरीकडे घेत असल्यामुळे अश्या या नगर पालीकेच्या ढिसाळ कारभाराचा नाहक त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना व नागरीकांना होत आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळ असलेल्या भाग्यनगर भागातुन फुलमळ्याकडे जाणाऱ्या उतार भागावर पाणी पुरवठा कमी दाबाने जावुन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कंट्रोल वॉल बसवण्यात येत आहे परंतु नगरपालिकेला उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे उतार भाग असलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा कंट्रोल करण्यासाठी वॉल बसवण्याची गरज आहे हे या खड्डा खोदलेल्या ठिकाणाच्या निरिक्षणावरून दिसत आहे या भागामध्ये जवळपास १४ वर्षानंतर पक्का सिमेंट रस्ता तयार झाला आहे रस्ताच्या एका बाजूला पक्की नाली नसल्यामुळे पावसाळ्यातील पावसाचे संपूर्ण पाणी या सिमेंट रस्त्याच्या बाजुच्या मार्गाने सतत वाहत असते वारंवार या भागातील नागरिकां कडून प्रशासनाला सूचना विनंती करून सुद्धा नगरपालिका बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही त्यातच याच पक्क्या रस्त्यावर खड्डे खोदुन पाणी पुरवठा सुरळीत व्हावा हे नगर पालीका पाणी पुरवठा विभागाला उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे पाणी कंट्रोल करण्यासाठी वॉल बसवण्याची नामुष्की येत आहे रस्त्याच्या उतारानुसार पाईप लाईनला वॉल बसवने आवश्यक असताना तो अगोदरच का बसवण्यात आला नाही असा सवाल या भागातील नागरिक कर्मचाऱ्यांना करित आहेत.
भाग्य नगर , सुफियान कॉलनी , काझी कॉलनी भागात जाणाऱ्या उतार भागावर आवश्यकते पेक्षा मोठा खड्डा का करण्यात आला अशी चर्चा होत आहे.
तसेच ज्या कर्मचाऱ्याचे हे काम नाही तो उंटावर बसून संबंधिताना मार्गदर्शन करित असल्याने संबंधित ठिकाणी अंदाजीत पाईप लाईन समजून ठेकेदारा कडून अनावश्यक खड्डे खोदली जात आहे वस्तुस्थिती अशी असते पाईप लाईनचा नकाशा घेवून व आवश्यक यंत्राच्या साहाय्याने तज्ञ अभियंत्यांनी मार्कींग करून त्या ठिकाणाची खोदाई करावी परंतु असे न करता ठेकेदाराला ज्याला यातले काही कळत नाही असे कर्मचारी उंटावर बसून अथवा फोनवर बोलून कामे दाखवली जातात त्यामुळे आवश्यकता नसताना नपा चे आर्थिक नुकसान होणार आहे त्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन आर्थिक दंड वसूल करण्यात यावा असे जनतेत बोलले जात आहे.
पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क केला असता प्रत्यक्ष येऊन संबंधित जागेची पाहणी केली जाईल व त्या खड्डयाचे फोटो मला पाठवा मी बघतो असे सांगण्यात आले.
ठेकेदाराच्या कामगारांना याविषयी विचारणा केली असता असे सांगण्यात आले की नगर पालीकेच्या एका कर्मचाऱ्याने आम्हाला अंदाजीत अशी पाईप लाईन आहे असे सांगून गेला व कसलीही खुण करून दिली नाही त्यामुळे आम्ही अंदाजानुसार वॉल साठी खड्डा खोदून पाईप लाईन बघत आहोत.
