जि.प.प्रा. शा.रुद्धा शाळेत शैक्षणिक सप्ताह संपन्न

0
जि.प.प्रा. शा.रुद्धा शाळेत शैक्षणिक सप्ताह संपन्न

जि.प.प्रा. शा.रुद्धा शाळेत शैक्षणिक सप्ताह संपन्नजि.प.प्रा. शा.रुद्धा शाळेत शैक्षणिक सप्ताह संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सप्ताहाची सुरुवात सोमवार दि. 22/7/2024 रोजी पासून झाली होती त्यांचे आज सरपंच गजानन चंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच नाथराव केंद्रे ,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शिवरतन केंद्रे तसेच सतीश केंद्रे, शाम गित्ते उपस्थित होते.
यामध्ये 22 जुलै अध्ययन- अध्यापन साहित्य दिवसा ने झाली दुसरा दिवस दिनांक 23 जुलै रोजी विषय:- मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस साजरा केला .दिनांक 24 जुलै रोजी क्रीडा दिन साजरा करण्यात आला. दिनांक 25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला ‌.दिनांक 26 जुलै रोजी सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. दिनांक 27 जुलै रोजी शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले.सदरील कार्यक्रमाचा समारोप दि 28 जुलै रोज रविवार रोजी शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी दानशूर अन्नदाते गावचे सरपंच गजानन चंदेवाड यांच्या तर्फे मुलांना तिथी भोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्यापिका श्रीमती. साके मॅडम ,श्री. गुळवे सर, श्री .बैकरे सर,मदतनीस श्रीमती दिव्याताई चंदेवाड इत्यादी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!