गंगोत्री आश्रम मालेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

0
गंगोत्री आश्रम मालेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

गंगोत्री आश्रम मालेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

श्री संत ह.भ.प वैकुंठवासी वैराग्यमुर्ती ब्रम्हीभुत संत गुरूवर्य सोपान काका महाराज ईसादकर ‌यांचा पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

गंगाखेड ( गोविंद काळे) : तालुक्यातील गंगोत्री आश्रम मालेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ह.भ.प ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सतत दहा दिवस महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मार्गदर्शन करणार आहेत या सप्ताहात काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीपद् भागवत कथा, गाथाभजन , हरिपाठ , किर्तन, हरिजागर , असे दैनदिन धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

२९ जुलै रोजी ह.भ.प मधुसूदन महाराज ठाकूरबुवा दैठणकर,३० जुलै रोजी ह.भ.प भागवत महाराज शिरवळकर (फडकरी) ३१ जुलै रोजी ह.भ.प.महेश महाराज काणेगावकर (माखणी) १ ऑगष्ट रोजी ह.भ.प योगीराज महाराज गोसावी (पैठणकर) श्री. संत एकनाथ महाराज पैठण यांचे 1४ वे वंशज, २ ऑगष्ट रोजी ह.भ.प.पुंडलिक महाराज देहूकर श्री. संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ३ ऑगष्ट रोजी ह.भ.प.उमेश महाराज दशरथे (आळंदीकर) गाथा मुर्ती भजनानंदी, ४ ऑगष्ट रोजी ह.भ.प. ज्ञानसिंधु संदीपान महाराज हासेगांवकर अध्यक्ष – जोग महाराज वारकरी संस्था, आळंदी (दे.), ५ ऑगष्ट रोजी ह.भ.प चैतन्य महाराज वासकर, पंढरपूर, ६ ऑगष्ट रोजी ह.भ.प. वेदांताचार्य उल्लास महाराज सूर्यवंशी शिक्षक – जोग महाराज वारकरी संस्था, आळंदी (दि.) ७ ऑगष्ट रोजी ह.भ.प कीर्तन केशरी अच्युत महाराज दस्तापूरकर ७ ऑगष्ट रोजी दु. १२ ते २ पूजेचे कीर्तन .ह.भ.प. गुरुवर्य विठ्ठल महाराज वास्कर पंढरपूर यांचे कीर्तन होईल व याचे यजमान गोविंद थोराजी कोल्हे , ८ ऑगष्ट रोजी सकाळी ८ ते ९ गणेशराव व्यंकटराव माने आजारसोंडा यांची नाष्ट्याची पंगत नंतर सकाळी ११ ते ०१ . ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम (छोटे-आळंदी दे.) यांचे गुलालाचे कीर्तन होईल. (यजमान गंगाधर नाना जवंजाळ) व लगेच महाप्रसाद सर्व गांवकरी मंडळी मौजे मालेवाडी व समस्त भक्तगण यांच्या तर्फे होईल. व रात्री ९ ते ११ . ह.भ.प.प्रकाश महाराज साठे, . ह.भ.प. कृष्णदास महाराज साताळकर, ह.भ.प. राम महाराज हेंडगे गुरुजी, ह.भ.प. ज्ञानोबा माऊली दुधगांवकर, . ह.भ.प. गणपत महाराज मानखेड, .ह.भ.प.अनंत महाराज हिवरेकर, .ह.भ.प. कृष्णा महाराज दस्तापूरकर, ह.भ.प. शिवा महाराज हिंगोलीकर, ह.भ.प. विलास महाराज गेजगे,, ह.भ.प. राम महाराज खोरसकर, ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर, ह.भ.प. ज्ञानोबा महाराज जामकर, ह.भ.प. मधुकर महाराज सायाळकर, ह.भ.प. त्र्यंबक महाराज दस्तापूरकर, ह.भ.प.गजानन महाराज देऊळगांवकर, उपस्थित महाराजांचे कीर्तन होतील.पहाटे ४ ते ६ ह.भ.प. गोपाळ महाराज ठाकूरबुवा, लोहगांवकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व परभणी मंडळी यांची काल्याची पंगत होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे.

सायाळा, सुनेगाव, बोरगाव खु., बोरगाव बु., खोरस, उमरा, पारवा, पडेगाव, कासारवाडी, माहेर, लेंडेगाव, चोश्याळ, लव्हाळ, पिंपरी (झो), मासला, सावंगी भुजबळ, गोपा पिपळगाव, बोरगाव तेलंग, पावडेवाडी, विठ्ठलवाडी, मसनेरवाडी आदी गावे सप्ताहामध्ये अन्नदानासाठी सहकार्य करणार आहेत तरी गंगाखेड तालुक्यातील तसेच मालेवाडी परिसरातील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन मालेवाडी ग्रामस्थांनी व ह.भ.प ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!