संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिक्षण सप्ताहात सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. या उपाक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा सहभाग नोंदविला.
यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी घोगरे व संगीता आबंदे यांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती सोबत विविध कलाकृती व उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले.
पर्यावरणातील गंभीर समस्या व हवामान बदल याविषयी मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ‘एक मूल एक झाड’ व आईच्या नावाने एक झाड लावून संगोपन करण्याचे आवाहन केले.
शालेय पोषण आहाराबाबत मुख्याध्यापक मीनाक्षी तोवर यांनी मार्गदर्शन केले. तसेच क्रीडा स्पर्धा, संख्याज्ञान, तंत्रज्ञान व कौशल्य विकास या उपक्रमात संत ज्ञानेश्वर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
