रोटरी क्लब अहमदपूरचा पदग्रहण सोहळा संपन्न

0
रोटरी क्लब अहमदपूरचा पदग्रहण सोहळा संपन्न

रोटरी क्लब अहमदपूरचा पदग्रहण सोहळा संपन्न

रोटरीचे जागतिक पोलिओ निर्मूलनाचे कार्य आदर्शच – योगीराज माने.

अहमदपूर (गोविंद काळे) : रोटरी ही जगभर सेवाभाव वृत्तीने कार्य करणारी संघटना आहे. रोटरीने जगामध्ये पोलिओ उच्चाटनासाठी नियोजनपूर्वक कार्य करत जगापुढे आदर्श ठेवला आहे असे मत कवी योगीराज माने यांनी अहमदपूर येथे रोटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक प्रांतपाल मुरली भुतडा हे रोटरीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात नूतन अध्यक्ष राजेंद्र कल्याणे व सचिव इंजिनिअर अनिल फुलारी यांनी मावळते अध्यक्ष प्रा शिवशंकर पाटील व सचिव श्रीराम कलमे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
यावेळी रो रामचंद्र गंगथडे यांनी संपादित केलेले रोटरीचे मुखपृष्ठ द प्लेज चे प्रकाशन करण्यात आले

या कार्यक्रमात पुढे बोलताना कवी योगीराज माने यांनी रोटरीच्या वृक्षारोपण, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील कार्याचा गौरव केला.

त्याबरोबरच कवी योगराज माने यांनी आपल्या एकाहून एक सरस कविता सादर करताना आई, वडील यांच्या कवितासह सामाजिक आशयाच्या कविता सादर करत उपस्थितांचे मने जिंकली.
या कार्यक्रमास आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून नूतन अध्यक्ष व सचिवांना शुभेच्छा दिल्या.
या पदग्रहण सोहळ्यात नूतन पदाधिकारी, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर, नवीन रोटरी सदस्य, रोट्रेक्ट क्लबचे अध्यक्ष एड. अजिंक्य चामे यांचा सत्कार करण्यात आला.
मावळचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यांनी केलेल्या कार्याचा अहवाल यावेळी सादर केला.
नूतन अध्यक्ष राजेंद्र कल्याणे यांनी येणाऱ्या वर्षात वृक्षारोपण ,बांबू लागवड, आरोग्य शिबिर, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला. या कार्यक्रमास मुखेड, नांदेड येथील रोटरी क्लब चे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर पाटील यांनी केले ,पाहुण्यांचा परिचय अनिल चवळे, मधुसूदन चेरेकर यांनी सूत्रसंचालन कपिल बिरादार तर आभार सचिव अनिल फुलारी यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी कवी नरसिंग इंगळे, ऍड भारत चामे, महेंद्र खंडागळे, प्राचार्य वसंत बिरादार, मोहिब कादरी ,गंगाधर याचवाड, उमेश गरुडकर, संजीव रेड्डी, द मा माने, नरसिंग चिलकावार, पांडुरंग गरुड पाटील, सचिन करकनाळे, डॉ मधुसूदन चेरेकर, डॉ पांडुरंग कदम, नजीब पठाण, डॉ अतुल खडके, धनंजय कोत्तावार, राहुल घाटोळ, ,द.मा माने, डॉ वैभव रेड्डी, डॉ महेश पलमटे, डॉ रेचवाडे, डॉ सतीश पेड, गोपाळ पटेल, धीरेंद्र ढेले, राम गंगथडे, कवी राजेसाहेब कदम, बालाजी पटवारी, ज्ञानोबा भोसले, रवी पुणे, प्रशांत घाटोळ, शिवशंकर शिवपुजे, आनंद खंकरे उपस्थित होते.

मोफत ब्लड शुगर तपासणी शिबिर

यावेळी रोटरी क्लब च्या वतीने उपस्थित सर्वांचे रक्तातील साखर तपासणी मोफत शिबिर घेण्यात आले. शिबिरात लॉईड हेल्थकेअर चे वैद्यकीय प्रतिनिधी प्रसाद पारसेवार यांच्या वतीने 246 जणांची मोफत ब्लड शुगर तपासणी करण्यात आली.)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!