मालकापूरच्या भारती पवारची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
मालकापूरच्या भारती पवारची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

मालकापूरच्या भारती पवारची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील कुमारी भारती पवार हिने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये 13 वर्षा खालील गटामध्ये 360 पैकी 336 गुण घेऊन सुवर्ण पदक मिळविले.
ही राज्यस्तरीय स्पर्धा अमरावती येथे झाली. या ठिकाणी पुर्ण महाराष्ट्रातून अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवीला होता. खेळाडू व पालक अमरावती येथे जमा झाल्याने राहण्यासाठी अडचणी येत होत्या, त्याच वेळेस लोणी गावचे सरपंच यमुनाजे भुजबळे यांनी क्रीडामंत्री कार्यालया कडून उदगीरच्या खेळाडूंची राहण्याची सोय करून देत खेळाविषयी आपले प्रेम दाखवले.
भारती बाबाराव पवार ही उदगीर तालुक्यातील मलकापूर येथील रहिवासी आहे. ती इंडियन राउंड प्रकारात गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये प्रशिक्षक सुधीर पाटील व सुषमा पवार, मारोती बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
भारतीला तिचे आजोबा मनोहर पवार क्रीडाप्रेमी यमुनाजी भुजबळे(सरपंच), भास्कर पाटील तसेच संघटनेचे पदाधिकारी सुनील साखरे, अशोक जंगमे, राजेंद्र देवकर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रणजित चामले व पालक उमाकांत भेदे, संदीप देशमुख यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!