राष्ट्रिय लोकअदालतीत 159 प्रकरणे निकाली एक कोटी २ लाखांचे रुपये वसूल
राष्ट्रिय लोकअदालतीत 159 प्रकरणे निकाली एक कोटी २ लाखांचे रुपये वसूल
उदगीर : राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित 159 प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. यात एक कोटी दोन लाख पन्नास हजार सहाशे चार रुपयांचे तंटे मिटले असून ती रक्कम वसूल झाली.
उदगीर येथील न्यायालयात एकूण ५ पॅनलच्या माध्यमातून तडजोडीने प्रकरणाने निकाली काढण्यात आली.
यावेळी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश पी. डी. सुभेदार, दिवाणी न्यायाधीश पी. बी. लोखंडे, सहदिवाणी न्यायाधीश के.ए. पोवार, सहदिवाणी न्यायाधीश एन.जे. चव्हाण, सहदिवाणी न्यायाधीश बी.आर. झेंडे आदी उपस्थित होते. तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणे एक हजार सहाशे चाळीस व वादपूर्व एक हजार सातशे सव्विस असे एकूण तिन हजार सहाशे 66 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण 159 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात न्यायालयीन प्रलंबित 129 तर वादपूर्व 30 प्रकरणांचा समावेश आहे. प्रलंबित प्रकरणात तडजोडीअंती 90 लाख 93 हजार 17 रुपये व वादपूर्व प्रकरणात 11 लाख 57 हजार 587 तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले, अशी माहिती उदगीर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने देण्यात आली. यावेळी उदगीर जिल्हा
न्यायालयाचे अधीक्षक एस.बी. मोरे यांच्यासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
