रक्तदान ही काळाची गरज – जवाहरलाल कांबळे

0
रक्तदान ही काळाची गरज - जवाहरलाल कांबळे

रक्तदान ही काळाची गरज - जवाहरलाल कांबळे

उदगीर (एल.पी. उगीले) : सध्या विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरीही, रक्त बनवण्याची कला अजून अवगत झाली नाही. त्यासाठी रक्तदान ही काळाची गरज बनली आहे. आपल्या रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचू शकतो. याची सामाजिक जाण ठेवून प्रत्येक तरुणाने रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा. असे आवाहन जवाहरलाल कांबळे यांनी केले. ते युवा नेते देवीलाल कांबळे यांच्या 28 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजक गौतम किवंडे, अमित मसुरे, पप्पू कांबळे, सुरज कांबळे, दर्शना कांबळे, दुर्गाप्रसाद गोटमुकले, वीरलाल कांबळे, अल्केश मादळे, अर्जुन मामडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या युवा नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवीलाल कांबळे मित्र मंडळाच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले. गोरगरिबासाठी अन्नछत्र तसेच सामाजिक जाणीव जपत वृक्षारोपण आणि नागप्‍पा अंबरखाने रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
मित्र परिवाराच्या वतीने शासकीय रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना फळे वाटपाचा ही कार्यक्रम राबवण्यात आला. तसेच शहरातील अनेक आश्रम शाळा आणि मतिमंद शाळा मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप करण्यात आला, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना जवाहरलाल कांबळे यांनी स्पष्ट केले की, आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. असेच उपक्रम राबवून समाजामध्ये नवे नवे आदर्श निर्माण करावेत. अशा अपेक्षा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वीरलाल कांबळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!