कापड्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला, 1 लाख 28 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
कापड्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला, 1 लाख 28 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कापड्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला, 1 लाख 28 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर (एल.पी.उगीले) : कापडाच्या दुकानात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला एक लाख 28 हजार रुपयांच्या मुद्देमालासह लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत थोडक्यात माहिती की, लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी एका कपड्याच्या दुकानाचा पत्रा काढून साड्या व कपडे चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या.


सदर पथकाकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी गुप्त बातमीदारा कडून नमूद गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली. सदर पथकाने नमूद गुन्ह्यातील आरोपीला दिनांक 30/07/2024 रोजी कळंब तालुक्यातील पाथर्डी येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव दादा बब्रुवान पवार, (वय 45 वर्ष राहणार पाथर्डी तालुका कळंब जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) ) असे असल्याचे सांगितले.
त्याच्या घराची झडती घेतली असता घरा मध्ये नवीन साड्या व कपडे मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या पत्नीसह लातूर जिल्ह्यातील रेनापुर येथील एका कपड्याच्या दुकानात चोरी केल्याचे व त्यामध्ये चोरलेले साड्या व कपड्याचा मुद्देमाल असल्याचे कबूल केले.
त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलसह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे रेणापूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार रामहरी भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, प्रकाश भोसले, सुरेश कलमे, प्रदीप चोपणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पुणेकर, पोलीस अमलदार गोरोबा इंगोले, अंकुश बिराजदार यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!