शास्त्री शाळेत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त बालसभा संपन्न

0
शास्त्री शाळेत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त बालसभा संपन्न

शास्त्री शाळेत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त बालसभा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.
बालसभेचे अध्यक्ष म्हणून कु.भगवती दिनेश देवनाळे तर, प्रमुख पाहुणे म्हणून चि.श्रीनाथ महेश बोळेगावे ,कु.आरोही शिवाजी राठोड व श्रीराम श्रीनिवास साबणे उपस्थित होते.शालेय विकास समिती अध्यक्ष रामराव कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजयराव चाटुफळे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार यांची विशेष उपस्थिती होती.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे शालेय विकास समिती अध्यक्ष रामराव कुलकर्णी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या महान कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व बाल सभेसाठी शुभेच्छा दिल्या.
अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक या थोर पुरुषांच्या महान कार्याविषयी शाळेतील ८३ विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली.बालसभेचे प्रमुख पाहुणे चि.श्रीनाथ बोळेगावे व कु.आरोही राठोड यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांनी देशासाठी केलेल्या महान कार्याविषयी माहिती सांगितली.
बालसभेचे अध्यक्ष कु.भगवती दिनेश देवनाळे यांनी विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे साहित्य मिळवून वाचन करावे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपणही देशसेवेसाठी तत्पर रहावे,असे आवाहन केले.सुत्रसंचलन कु.आरोही सुनील पुल्लागोर यांनी केले तर,आभार कु.मुक्ताई दिलीप इंगळे यांनी मानले.
बालसभा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल शालेय विकास समिती अध्यक्ष रामराव कुलकर्णी,भा.शि.प्र.संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शालेय विकास समिती कार्यवाह विजयराव चाटुफळे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार यांनी अभिनंदन व कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!