कृषक, गरीब, मजुर, दलित, दुःखी जनांच्या वेदना साहित्यातून व्यक्‍त करणारा उपन्यास सम्राट, मुन्शी प्रेमचंद डॉ. बालाजी कारामुंगीकर यांचे प्रतिपादन

0
कृषक, गरीब, मजुर, दलित, दुःखी जनांच्या वेदना साहित्यातून व्यक्‍त करणारा उपन्यास सम्राट, मुन्शी प्रेमचंद डॉ. बालाजी कारामुंगीकर यांचे प्रतिपादन

कृषक, गरीब, मजुर, दलित, दुःखी जनांच्या वेदना साहित्यातून व्यक्‍त करणारा उपन्यास सम्राट, मुन्शी प्रेमचंद डॉ. बालाजी कारामुंगीकर यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : 15 कादंबर्‍या आणि 300 कथा लिहून भारतातील शेतकरी, गरीब, मजुर दलित दुःखी, महिलां आदी जनांचे दुःख साहित्यात्यून व्यक्‍त करणारे उपन्यास सम्राट मुन्शी प्रेमचंद असल्यासचे प्रतिपादन यशवंत ज्यु. कालेज येथील डॉ. बालाजी कारामुंगीकर यांनी केले.
ते यशवंत ज्यु. कॉलेज येथे आज दि. 31 जुलै रोजी मुन्शी प्रेमचंद यांच्या जयंती निमित्‍त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. सय्यद एम.यू. हे होते. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. अनिल चवळे यांची उपस्थिती होती. यावेळी विज्ञान प्रमुख प्रा. दिनेश तोंडारे, प्रा. सुरेंद्र येलमटे, प्रा. पुणे आर.जी., प्रा. घटकार शिवाजी, श्रीशैल्य मलशेट्टे, प्रा. निळकंठ चिवडे, युवराज पाटील, मोहन कांबळे आदीचीं उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. बालाजी कारामुंगीकर म्हणाले की, प्रेमचंद यांनी सेवासदन, प्रेमाश्रम, रंगभूमी, निर्मला, कायाकल्प, गबन, कर्मभूमी, गोदान इत्यादी अनेक कादंबर्‍या लिहुन समाजातील कृषक, गरीब, मजुर, दुःखी, महिला यांच्या वेतना व्यक्‍त केल्या. त्यांच्या साहित्यातून अंधश्रद्धा, बेरोजगारी, अशिक्षा, महिलांवर होणारा अत्याचार अश्या अनेक गोष्टिंचा उलगडा होतो. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मानवीय मूल्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय कृषक जीवनावर आधारित गोदान ही त्यांची अमर कलाकृती महाकाव्य म्हणून संपूर्ण जगात ओळखली जाते. संग्राम, कर्बला, प्रेम की वेदी ही त्यांची तीन नाटके. 10 अनुवाद, 7 बालपुस्तके, संशोधनपर लेख असे विशाल साहित्य निर्माण करुन जनमानसांचे दुःख, वेदना मांडल्या. प्रेमचंद यांचे साहित्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही खुप महत्वाचे ठरते. जेव्हा भारताचे स्वातंत्र्य आंदोलन चालू होते तेव्हा त्यांनी कथा साहित्याद्वारे हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषांमध्ये साहित्य निर्माण करुन समाजजागृती करण्याचे मौलिक कार्य केले. त्यांनी सियासी सरगर्मीला, जोशला आणि आंदोलनाला सगळ्यांपुढे मांडले, आणि ताक़तवर बनविले. त्यामुळे त्यांचे लेखन पण ताक़तवर झाले. प्रेमचंद या अर्थाने निश्चितच हिंदीचे पहिले प्रगतिशील लेखक आहेत. प्रेमचंदांनी हिंदीत कथांच्या एका परंपरेला जन्म दिला आणि एक पूर्ण पिढ़ी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत गेली. त्यांनी फक्त देशभक्तीवरच लिहिले नाही तर, त्याच बरोबर समाजाला ग्रासलेल्या अनेक वाईट परंपरा पाहिल्या आणि त्या कथाच्या रूपात लोकांसमोर ठेवून समाज जागृत करण्याचे कार्य केले असेही ते शेवटी म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य सय्यद एम. यू. म्हणाले की, मुंशी प्रेमचंद यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मुल्याची रुजवनूक केली व त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मानवाला, समाजाला, देशाला नवी दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे.
कार्यक्रमाचे संचलन प्रा. निळकंठ चिवडे यांनी केले तर आभार प्रा. घटकार एस.टी. यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!