मोहम्मद रफी यांच्या स्मृतीदिनी अभिवादन..! मोहम्मद रफी यांना भारतरत्न देण्याची मागणी
मोहम्मद रफी यांच्या स्मृतीदिनी अभिवादन..! मोहम्मद रफी यांना भारतरत्न देण्याची मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : महान गायक स्वरसम्राट पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या सृतीदिनाच्या निमित्ताने शहरातील मोहम्मद रफी मार्गाच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने सामूहिक अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी जेष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोहम्मद रफी सारखा अष्टपैलू गायक भविष्यात होणार नाही.त्यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत करण्याचा प्रयत्न केला अशी भावना व्यक्त केली.
तर कार्यक्रमाचे संयोजक तथा अकादमीचे अध्यक्ष युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी मोहम्मद रफी यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून प्रेम,शांती, राष्ट्रभक्ती वध्दींगत करण्याचा संदेश दिला आहे.रफीं सारख्या महान गायकाचा आणी त्यांच्या कलेचा सन्मान करण्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून त्यांचा गौरव करणे गरजेचे आहे.या मागणीचा सर्व कला प्रेमींनी पाठपूरावा करावा असे अवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी घोगरे पाटील,अँड.निखिल कासनाळे, सय्यद अनवर, अकादमीचे उपाध्यक्ष सय्यद याखूबभाई, गफ्फारभाई पठाण, माजी नगराध्यक्षा सौ सरस्वती कांबळे,घोगरे पाटील,विजय कुंटे, सिध्दार्थ गायकवाड, शंकर नावंदे, संविधान कदम, आकाश वाघमारे, संतोष सोनकांबळे,अभय गुळवे, प्रथमेश सोनकांबळे, राहुल वाघमारे, बापू वाघमारे, सुमित कांबळे, बालाजी शिंदे,आण्णाराव सुर्यवंशी,शरद बनसोडे,पत्रकार अजय भालेराव, भिमराव कांबळे,त्रिशरण मोहगावकर, सचिन बानाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
