लोकवर्गणीतून केलेला रस्ता गेला वाहून

0
लोकवर्गणीतून केलेला रस्ता गेला वाहून

लोकवर्गणीतून केलेला रस्ता गेला वाहून

अहमदपूरच्या आयोध्या नगरीत म्हसी पण घेतात पोहण्याचा आनंद…नगर परिषदेचे प्रचंड दुर्लक्ष

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर च्या नगरपालिका परिषदेच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून नांदेड रोड लगत असलेल्या आयोध्या नगरीतील नागरिकांनी लोक वर्गणीतून मुरूम टाकून रोड तयार केला परंतु प्रचंड झालेल्या पावसामुळे कॉलनीला तळ्याचे स्वरूप आले असून, म्हशी पण पोहण्याचा आनंद घेत आहेत तर मुरूम टाकलेला रोड वाहून गेला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर ची नगरपरिषद अहमदपूरकरांना प्राथमिक सेवा पुरविण्यास असफल ठरली असून, अहमदपूर येथील नांदेड रोड लगत असलेल्या आयोध्या नगरीमध्ये महिन्यातून एक ते दोन वेळेस फोन केला तर घंटागाडी येते तसेच स्ट्रीट लाईटची व्यवस्था ही नगरपालिके कडून होत नाही. कुठे पोल आहेत तर कुठे नाहीत ? जिथे पोल आहेत तिथे विद्युत तारा ओढल्या नाहीत. अशी परिस्थिती अयोध्या नगरीची आहे.
त्याचबरोबर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कॉलनीतील लोकांनी लोकवर्गणीतून मुरूम टाकून रस्ता तयार केला होता प्रचंड पडलेल्या पावसामुळे तो रस्ताही वाहून गेला आणि रस्त्याच्या कडेला तळ्याचे स्वरूप निर्माण झाले त्या तळ्यामध्ये म्हशी पोहण्याचा आनंद घेत आहेत परंतु अयोध्या नगरीतील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे माजी नगरसेवक ही हतबल झाले असून, या समस्येकडे नगरपालिकेचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. त्वरित नगरपालिकेने यावर लक्ष द्यावे, अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा चाकूर पं.स.चे माजी सभापती सुनील डावरे, इंजि. योगेश राजूरकर, संतोष जुबरे , प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर ,राजीव ठोंबरे , माधव पोपतवार, साहेबराव लांडगे ,सचिन देशपांडे, रामेश्वर हाडोळीकर, गणेश वारलवाड , माधव वारलवाड ,दयानंद गाडे, विनोद पोपतवार आदी अयोध्या नगरीतील नागरिकांनी दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!