छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपच्या वतीनेअण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपच्या वतीनेअण्णाभाऊ साठे जयंती साजरी

छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपच्या वतीनेअण्णाभाऊ साठे जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शाहू राजे युवा ग्रुप कडून महाराष्ट्र संयुक्त चळवळीचे प्रणेते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी वैचारिक जयंती सकाळी 7:00 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अहमदपूरच्या योगा मैदानावर साजरी करण्यात आली.
याप्रसंगी योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री प्रभाकर ती गोटे अण्णा आणि मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष माननीय अशोकरावजी चापटे सर यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य डी एस वाघमारे सर, अशोकराव सापटे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, श्री गणेश वाघमारे सरांनी अण्णाभाऊ यांची माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहीली ही छक्कड गळ्यावर अत्यंत सुंदर पद्धतीने गाऊन दाखवली आणि उपस्थितांची मने जिंकली.
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप चे अध्यक्ष श्री एन डी राठोड यांनी खंत व्यक्त केला की अण्णाभाऊंनी अजरामर शंभर पुस्तकांची निर्मिती केली पण आपण अण्णाभाऊ ना साहित्यरत्न म्हणतो पण भारत सरकारने अद्यापही अण्णाभाऊ साठे यांना साहित्यरत्न ही पदवी दिलेली नाही याच्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यावेळी विक्रम सिंह कचवे, ज्ञानोबा गायकवाड माऊली, श्रावण दादा वाघमारे, ह भ प संजय महाराज नागपूरने, प्रभाकर ती गोटे अण्णा, शिवाजीराव सूर्यवंशी आडत, अविनाश मंदाडे,, प्रकाश देशपांडे, गौतम तलवारे, बालाजी बैकरे सर यांनी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचलन
अविनाश मंदाडे यांनी केले तर आभार ह भ प संजय महाराज नागपूरने यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!