अहमदपूर रनर्स ग्रुपचे सदस्य वेदांत राठोड यांनी सलग 30 दिवसात 11 किमी धावण्याचा केला विक्रम

0
अहमदपूर रनर्स ग्रुपचे सदस्य वेदांत राठोड यांनी सलग 30 दिवसात 11 किमी धावण्याचा केला विक्रम

अहमदपूर रनर्स ग्रुपचे सदस्य वेदांत राठोड यांनी सलग 30 दिवसात 11 किमी धावण्याचा केला विक्रम

निरोगी आरोग्यासाठी आगळा वेगळा संकल्प

अहमदपूर (गोविंद काळे) : येथे एकशे विस सदस्य असलेला एक अहमदपूर रनर्स ग्रुप आहे या ग्रुपचे सर्व सदस्य आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी दररोज पहाटे जवळपास कधी दहा किलोमिटर तर कधी पाच किलोमिटर धावत असतात याच ग्रुपचे एक सदस्य वेदांत राठोड यांनी संकल्प करून 30 दिवसात दररोज 11 किलोमिटर धावण्याचा आगळा वेगळा प्रयोग करीत विक्रम केला असुन निरोगी आयुष्य जगण्यासाठी आदर्श निर्माण केला आहे

शहरामध्ये अहमदपूर रनर्स ग्रुप या नावाने पहाटे धावण्याचा 120 जणांचा एक ग्रुप आहे.या ग्रुपचे सदस्य रोजच आपल्या निरोगी आरोग्यासाठी पाच किलोमीटर तर कधी दहा किलोमीटर नित्य नियमाने धावत असतात व त्यासोबत नॅशनल इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवुन अहमदपूरच्या नावाचा दबदबा निर्माण केलेले बरेच धावपटू गेल्या 14 वर्षापासून ह्या ग्रुप मध्ये कार्यरत आहेत.
याच ग्रुपचे एक सदस्य वेदांत राठोड यांनी एक अनोखा 30 दिवसात दररोज 11 किमी धावण्याचा संकल्प केला होता देशातील युवा पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. त्यामुळे नवी पिढी अनेक रोगाने ग्रस्त झाली असुन समाजात आपले निरोगी आरोग्य किती महत्वाचे आहे हाच संदेश समाजाला दाखवुन द्यावा हा एकच उद्देश मनात ठेऊन संकल्प करून त्यांनी 02 जुलै रोजी रोज 11 किमी धावण्यास सुरवात केली. मनुष्य हा एखादा दिवस 11 किमी धावेल दोन दिवस धावेल पण रोज धावणे व आपले शरीर त्या धावण्यासाठी समर्पित करणे हे तेवढे सोपे कार्य नसतांनाही मनात एक दृढ निश्चय ठेवून रोज 11 किमी भर पावसात सुध्दा धावुन दि 31 जुलै रोजी वेदांत राठोड यांनी आपला संकल्प पुर्ण केला असुन 330 किमी धावुन समाजापुढे एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी आदर्श निर्माण केला आहे
या विक्रमाबद्दल भरत इगे ,संतोष भुरे, साकोळे सर राठोड ,नामदेव बरुरे, धनंजय तोकले ,दीपक वलसे , लुल्ला शेख, बैकरे सर ,अजब सिंग, डॉ गणेश कदम , संजय सरकाळे तुकाराम उगिले ,डॉक्टर अमृत चिवडे ,शिवाजी चोथवे, डॉक्टर स्वामी अक्षय मलवाड, श्रीराम फासगे, पवन पुरोहीत, प्रा.संतोष पाटील, अलापुरे सर, बैकरे सर आदीसह ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे या विक्रमा बद्दल सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे

चौकट :

गेल्या दहा वर्षांपासून मी सतत धावत असून शरीर आता त्यानुसार कार्य करत आहे. माझ्या मनात आले की युवा पिढी व्यसनाधीन होत आहे त्यामुळे मी ठरवले की एक धाव व्यसनमुक्तीसाठी असा संकल्प करून दररोज 11 किमी धावून 30 दिवसात तो पुर्ण केला आरोग्यासाठी प्रत्येकानेच व्यायाम करणे , धावणे ,चालणे हे गरजेचे आहे किमान दररोज अर्धा ,पाऊण तास तरी व्यायाम केला पाहिजे त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते

वेदांत राठोड
सदस्य रनर्स ग्रुप अहमदपूर.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!