संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

0
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील करडखेल पाटी येथे मराठा समाजबांधवांतर्फे मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन छ.संभाजी महाराज चौक, करडखेल पाटी येथे उदगीर उपविभागाचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनासाठी तालुक्यातून शिवाजी भोळे, धनाजी मुळे, उदय मुंडकर, सतीश पाटील मानकीकर, बाळासाहेब पाटोदे, बिपीन पाटील, प्रशांत जगताप, राहुल अतनूरे, गोपाळ पाटील, संदीप पाटील, निमिषन पाटील, हिमांशु पाटील आदि समाजबांधव उपस्थित होते. त्यानंतर शिबिरास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरविंद पवार, विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आदींनी भेट दिली.
यावेळी रामचंद्र कंजे, संगम बिरादार, जगदीश हमीने, हरी गुरमे, महेश मोरे, अनिल मुळे, सुधाकर घोगरे, किरण निडवंचे, ज्ञानेश्वर मुडबे, शशिकांत बेबनाळे, मोहन पाटील, नितीन निडवंचे, निमिचंद पाटील, मिलिंद शिंदे, श्रीरंग गायकवाड, रूपेश गायकवाड, संस्कार माटेकर,मुकुंद बिरादार, संदीप पाटील, अजित जाधव, प्रज्वल ढगे, बाळराजे पवार यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले.या शिबिराच्या आयोजनासाठी भाकसखेडा विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव, करडखेलचे सरपंच नामदेव मुळे, दिलीप होणाळे, डॉ.कंजे, दयानंद बिरादार, रावसाहेब गायकवाड, नरसिंग पाटील, प्रविण सांगवे, गुरुदत्त माटेकर, कृष्णा घोगरे, निखिल जांभळे, धर्मराज जाधव, प्रदीप गायकवाड, लक्ष्मण बुर्ले, ज्ञानेश्वर मुडबे, नवनाथ गायकवाड, मिलिंद कसबे, सुभाष बेडगे व नागप्पा अंबरखाने ब्लड बँक चे कर्मचारी आदिनी प्रयत्न केले. यावेळी डॉ.चिकमुर्गे रक्तदात्यांच्या मदतीसाठी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!