शिवाजी महाविद्यालयामध्ये किसान वार्षिकांकाचे प्रकाशन
शिवाजी महाविद्यालयामध्ये किसान वार्षिकांकाचे प्रकाशन
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयामध्ये किसान वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव पी टी शिंदे,पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ.अरविंद नवले,उपप्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे, विशेषांकाचे कार्यकारी संपादक डॉ. नरसिंग कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही आर भोसले, ग्रंथपाल डॉ. व्ही एम पवार,प्रबंधक बालाजी पाटील, व्हि डी गुरुनाळे,आर.एम.लाडके यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी वार्षिकांक काढला जातो. 2023-24 साठी संपादक मंडळांनी भारतीय स्वातंत्र्य लढा हा विषय दिलेला होता. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत या विषयामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वक लेखन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यकारी संपादक डॉ. नरसिंग कदम, संपादक मंडळ सदस्य डॉ. एम. एफ. नदाफ, डॉ. पी.डी.माने,प्रा.बालाजी सूर्यवंशी, डॉ एन.डी.शिंदे यांनी केले. या अंकाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व उपप्राचार्य यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
