महिला मोर्च्याच्या उदगीर शहर अध्यक्ष पदी सरोजाताई वारकरे यांची निवड
महिला मोर्च्याच्या उदगीर शहर अध्यक्ष पदी सरोजाताई वारकरे यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या उदगीर शहर अध्यक्ष पदी भाजपा च्या ज्येष्ठ नेत्या सरोजाताई वारकरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा उदगीर शहर अध्यक्ष मनोजदादा पुदाले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे,न.प उपाध्यक्ष सुधीर भोसले, धर्मपाल नादरगे, नगर सेवक बापूराव येलमटे , विधिज्ञ दत्ता पाटील,शहर सरचिटणीस आनंद बुंदे,जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष उत्तरा कलबुर्गे,तालुका अध्यक्ष, उषा माने,जिल्हा सरचिटणीस जया काबरा, सोमनाथपूर ग्राम पंचायत सदस्या शिवकर्णा अंधारे,जिल्हा उपाध्यक्ष श्यामला कारामुंगे,जिल्हा सचिव बबिता पांढरे,जिल्हा उपाध्यक्ष रेणुका डुबूकवाड, माजी नगर सेविका अरुणा चिमेगावे, महिला जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी जिवणे, जिल्हा सचिव स्वाती वट्टमवार, भाजपा नेत्या सुनीता स्वामी,शहर सरचिटणीस शिवगंगा बिरादार,प्रशान्त रंगवाळ आणी सर्व पदाधिकारी ,महिला उपस्थित होत्या.
