जिल्हा परिषद शाळांनी शिक्षणाचा दर्जा वाढवावा – सुनील केंद्रे
जिल्हा परिषद शाळांनी शिक्षणाचा दर्जा वाढवावा - सुनील केंद्रे
उदगीर (एल पी उगीले) : जिल्हा परिषद शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा वाढवावा, आणि स्पर्धेमध्ये उतरावे. असे आवाहन सरपंच सुनील केंद्रे यांनी केले. ते कुमठा येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीच्या नंतर मार्गदर्शन करताना बोलत होते. जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीची निवड सरपंच सुनील केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
अध्यक्ष म्हणून सिद्धेश्वर सोपान केंद्रे, उपाध्यक्ष म्हणून प्रशांत राजकुमार पवार, अंजली वैजनाथ डिगोळे, सुभाष व्यंकटराव केंद्रे, सुभाष माधवराव डिगोळे, पार्वती पद्माकर केंद्रे, लक्ष्मीबाई इंद्रजीत मंदे, माधव शंकरराव पाटील, ज्योती संतोष रणक्षेत्रे, कृतिका अर्जुन केंद्रे, शुभम राहुल माने, पपुलवाड ए एल, मुख्याध्यापिका सौ भंडारे इत्यादी मान्यवर व्यवस्थापन समितीवर काम करणार आहेत.
पुढे बोलताना सुनील केंद्र म्हणाले की, सध्या शिक्षणामध्ये स्पर्धा आहे. तरी देखील जिल्हा परिषदेच्या सर्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये बहुतेक सुविधा पुरविल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिता यावे, यासाठी फिल्टरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणा सोबतच आरोग्याकडेही लक्ष द्यावे. असेही त्यांनी सांगितले.
