अहमदपूर तालुक्यात ब्रम्हवाडी शिवारात आढळली दीडशे किलो वजनाची मगर

0
अहमदपूर तालुक्यात ब्रम्हवाडी शिवारात आढळली दीडशे किलो वजनाची मगर

अहमदपूर तालुक्यात ब्रम्हवाडी शिवारात आढळली दीडशे किलो वजनाची मगर

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील ब्रम्हवाडी शिवारात कोणतीही मोठी नदी अथवा तलाव जवळपास नसतानाही एका शेतकऱ्याच्या शेतात कालव्यात जवळपास दीडशे किलो वजनाची मगर सोयाबीनच्या रानात आढळून आली. गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) रोजी मध्यरात्री हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात येताच वन विभागाशी संपर्क साधुन परिसरातील शेतकरी व सर्प मित्रांच्या मदतीने ही मगर पकडून अहमदपूर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली होती व त्या मगरीला पुणे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे

याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील ब्रम्हवाडी परिसरात शिवदास घुगे या शेतकऱ्याच्या शेताजवळ मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कुत्री भुंकत होती. कुत्री का भुंकताहेत हे पाहण्यासाठी शेतकरी या परिसरात गेले असता सोयाबीनच्या शेतात कालव्यात महाकाय मगर असल्याचे लक्षात आले असता संदर्भाची माहिती त्यांनी तातडीने अहमदपूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु हे अधिकारी पहाटे ५ वाजता घटनास्थळी पोहचले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी गोविंद माळी , रामभाऊ केसाळे उदगीर जि.बि काळे जळकोट, वनरक्षक गडकर, होनराव, राठोड , अंबुलगेकर, बोंबले मॅडम सर्पमित्र सिध्दार्थ काळे , आशिष कलुरे,उद्धव देगलुरे, योगेश तेलंगे , कान्हा पांचाळ, भानुदास ससाने , गजानन कांबळे आदींच्या पथकाने आणि शेतकऱ्यांच्या मदतीने दोन तास अथक प्रयत्न करून ही मगर पकडण्यात यश आले. मगर ताब्यात घेतल्यानंतर तिला वन विभागाच्या जीपमध्ये टाकून अहमदपूर येथे आणुन वैद्यकीय पशुधन विकास अधिकारी डॉ.सुयोग येरोळे यांनी मगरीची वैद्यकीय तपासणी केली असता सदरील मगर नर जातीची असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्यामगरीचे वय १० ते ११ वर्ष वजन १५० किलो व लांबी ९ फुट असल्याचे वैद्यकीय पशुधन विकास अधिकारी यांनी सांगीतले

रात्रीच पुण्याला पाठवले

मन्याड नदी पात्रात मगर नेहमी येत असतात. गत वर्षीही चाकूर तालुक्यात अशाच पध्दतीने मगर आली होती. बहुदा ही मगर सुध्दा मन्याड नदी पात्रातून आली असावी. साधारण दीड क्विंटल वजन असलेली ही मगर नऊ फुट लांब आहे. तिची वैद्यकीय तपासणी केली असती ती फिट असल्याचा अहवाल अहमदपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिला आहे. ही मगर दि १ ऑगस्ट रोजीच रात्री पुणे वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
आश्विनी आपेट, वन परिक्षेत्र अधिकारी, अहमदपूर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!