यशवंत विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
यशवंत विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालया च्या प्रांगणामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहाचे वातावरणामध्ये विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. प्रारंभि प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते दोन्हीही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे,शिवाजी सूर्यवंशी, विभाग प्रमुख कपिल बिराजदार, राजेश कजेवाड, विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी बनसोडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन प्रसंगी राम तत्तापुरे म्हणाले की, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर शिक्षणाच्या क्षेत्रात प्रचंड भरारी घ्यावी असे जाहीर आवाहन केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य गजानन शिंदे यांनी केला. यावेळी विद्यालयातील निवडक मुला मुलांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कांबळे व अक्षरा मठपती यांनी केले तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी बनसोडे यांनी मांनले.
