पाच मंदिराच्या दानपेटीतील रक्कम, देवीच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक!

0
पाच मंदिराच्या दानपेटीतील रक्कम, देवीच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक!

पाच मंदिराच्या दानपेटीतील रक्कम, देवीच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक!

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर व जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १७ जुलै च्या मध्यरात्री पाच वेगवेगळ्या गावच्या मंदिरातील दान पेट्या फोडून त्यातील रक्कम पळवणारे, तसेच देवीच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपींना अहमदपूर पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा कबूल केलेल्या आरोपींच्या मुस्क्या आवरून त्यांच्याकडून २ लाख १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना अटक केली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, दि. १७ जुलै च्या मध्यरात्री चोरट्याने अहमदपूर व जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या पाच गावच्या मंदिरातील दान पेट्या फोडून त्यातील रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने चोरून पोबारा केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बि डी भुसनूर यांच्या नेतृत्वात अहमदपूरच्या पोलीस अधिकारी व अंमलदाराचे पथक तयार करून वरील गुन्ह्याचा सखोल तपास चालू केला. यातच नेमलेल्या बातमीदाराकडून मंदिरा ची दानपेटी व देवीचे दागिने चोरणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
वरील माहितीचा बारकाईने अभ्यास करून, दानपेटीतील रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने चोरणारे आरोपी १)महबूब आजमुद्दीन शेख वय ३६ रा. बनशेळकी रोड उदगीर, २) अज हर हुसेन भांडे वय २४ रा. मरसांगवी ता. जळकोट, ३) शिवराज रतनसाब तांबोळी वय २० रा. समता नगर उदगीर, यांना आरोपी निष्पन्न करून त्यांच्या राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा कबूल केला, व मंदिरातील देवाच्या मूर्तीवरील दागिने, दानपेटीतील रोख रक्कम असा एकत्रित २ लाख १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन वरील आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक केली आहे.
सदरच्या कारवाईत, पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांच्या नेतृत्वाखालील पथकामध्ये पोलिस अमलदार तानाजी आरदवाड, बापूराव धुळगुंडे, राजकुमार उबेटवार, पिराजी पुठेवाड, चिमनदरे, बाळू आरदवाड, साळवे, केशव जायभाये यांचा सहभाग होता. पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!