महेश पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सभापती मंचकराव पाटील तर उपाध्यक्षपदी बाबुरावजी सैदापुरे
महेश पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सभापती मंचकराव पाटील तर उपाध्यक्षपदी बाबुरावजी सैदापुरे
अहमदपूर (गोविंद काळे) : नुकतीच शिरूर ताजबंद येथील महेश पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात महेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिरूर ताजबंद संस्थेच्या नवनिर्वाचित व्यवस्थापन समितीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी आदिनाथ पालवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी या बैठकीमध्ये पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मंचकराव पाटील व उपाध्यक्षपदी बाबुराव सैदापुरे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल अहमदपूर चाकुर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार बाबासाहेब पाटील यांनी सभापती मंचकराव पाटील व बाबुराव सैदापूरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
तसेच संचालक सूर्यकांत उडतेवार, प्रल्हाद मिटकर, रामप्रसाद जाजू, शिवानंद भुरे, किशन तेलगाने, मच्छिंद्र वाघमारे, सौ. भाग्यश्रीताई चव्हाण, सौ. शाबीयाबी पठाण यांचे देखील अभिनंदन करून सन्मान केला. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. आर. एन. वलसे सर, प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, उन्नी चेअरमन चंद्रकांत गंगथडे यांच्यासह सर्व संचालक, महेश पतसंस्थेचे मुख्य सरव्यवस्थापक भारत क्षिरसागर, शाखा व्यवस्थापक मोहन खेडकर, शाखा व्यवस्थापक सिसोदे हरिश, मोला शेख , मोनिका कदम, गणेश शिंदे, बालाजी तिडोळे
दिनेश लामतुरे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
