अहमदपूर विधानसभा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांनी लढवावी
अहमदपूर विधानसभा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांनी लढवावी
(मनसे मेळाव्यात प्रदेश सरचिटणीस बाळा शेंडगे यांचे प्रतिपादन)
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांनी आदेश दिला तर अहमदपूर विधानसभा जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने लढवावी येथील राजकीय समिकरणाचा त्यांना फायदा होऊ शकतो असे प्रतिपादन अहमदपूर विश्रामगृह येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात पक्षाचे विधानसभा निरीक्षक प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे यांनी केले.यावेळी प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे,सरचिटणीस आचरेकर,येवले,जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने,शेतकरी सेना प्रदेश सचिव भागवत कांदे,मनवीसे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण, महिला सेना जिल्हाध्यक्ष प्रीती भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.निवडणूक प्रचार यंत्रणेसाठी पक्षाचे पदाधिकारीपदे जे रिक्त असतील भरावे व हे मनसैनिकांचे जाळे गाव पातळी पर्यंत विणले जावे यासाठी तुम्हाला वेळ खूप कमी असल्याकारणाने तुम्ही आत्ताच प्रचार सुरू करत मतदार संघात गावोगावी भेट सुरू करा व मनसेचे वारे निर्माण करा असे आवाहन प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी केले.यावेळी मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाने,अहमदपूर तालुकाध्यक्ष विलास पाटील,चाकूर तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,तालुका उपाध्यक्ष उत्तम पाटील,गजानन पांगरे, बसवराज होनराव,तालुका सचिव सूरज पलमटे,मनवीसे तालुकाध्यक्ष अजय तुपकर मानखेड ,सोनखेड,कोपरा,मांडणी,चापोली आदी अनेक गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
