भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्या हस्ते
भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्या हस्ते
प्रभाग 11 व 12 मधील विकास कामांचा शुभारंभ
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील प्रभाग 11 व 12 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी करण्यात आला. प्रामुख्याने अजिंठानगर भागात रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम भाजप शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्या प्रयत्नातून होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी देवीदास काळे यांचा सत्कार करून आभार मानले. सदरची विकासकामे माग लागल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यावेळी नगरसेविका तथा महिला मोर्चाच्या अध्यक्षा रागिणी यादव, नगरसेवक विशाल जाधव, माजी नगरसेवक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी सूडे, मंडल अध्यक्ष आबा चौगुले व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
