भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उदगीर विधानसभा प्रमुखपदी सौ.शिवकर्णा अंधारे
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उदगीर विधानसभा प्रमुखपदी सौ.शिवकर्णा अंधारे
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,भाजपा महिला मोर्च्या प्रदेश अध्यक्षा श्रीमती चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस रेखा हक्के, महिला मोर्च्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, लातूर जिल्हा ग्रामीण सरचिटणीस प्रणिता बेबळगे यांच्या नेतृत्वाखाली दहा ते पंधरा वर्षापासून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या सोमनाथपूर ग्रामपंचायत सदस्या सौ.शिवकर्णा अंधारे यांची उदगीर विधानसभा महिला मोर्चा प्रमुख पदी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी नगराध्यक्ष सुधीर भोसले, शहराध्यक्ष मनोज पुदाले, उमेश पाटील, बाळासाहेब पाटोदे, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, बापूराव यलमटे, सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, अरुणा चिमेगावे, गणेश गायकवाड, शहर सरचिटणीस आनंद बुंदे,महिला मोर्चा तालुकाध्यक्षा उषा माने , शहराध्यक्षा सरोज वारकरे, संजय पाटील, श्यामल करामुंगे, रेणुका डुबूडवाड, बबिता
पांढरे, सुलोचना जाधव, स्वाती वटमवार, मंदाकिनी जिवणे, शिवगंगा बिरादार, सुनीता स्वामी, सुरेखा केंद्रे, प्रशांत रंगवाळ, सुभाष कांबळे सह अनेक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.
