इस्त्रोच्या भारतीय अंतरीक्ष हॅकाथॉन २०२४ साठी चैतन्य क्षिरसागर याची निवड अहमदपूरात सत्कार
इस्त्रोच्या भारतीय अंतरीक्ष हॅकाथॉन २०२४ साठी चैतन्य क्षिरसागर याची निवड अहमदपूरात सत्कारइस्त्रोच्या भारतीय अंतरीक्ष हॅकाथॉन २०२४ साठी चैतन्य क्षिरसागर याची निवड अहमदपूरात सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : इस्त्रोच्या भारतीय अंतरीक्ष हॅकाथॉन २०२४ मधील ग्रॅड फिनाले साठी लातुरचा भुमिपुत्र चैतन्य क्षिरसागर याची निवड झाली असून दि १३ व १४ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या ग्रँड फायनल मध्ये पुण्याच्या पीसीसीओई इंजिनीरिंग कॉलेजची ही टीम चैतन्यच्या नेतृत्वात देशभरातील NIT, IIT यासारख्या नामांकित कॉलेजेस मधून आलेल्या टीम्स सोबत ग्रँड फिनाले मध्ये आपले प्रोजेक्ट्स सादर करणार आहेत या निवडी बद्दल त्याचा अहमदपूर येथे अभिनंदन करून यथोचित सत्कार करण्यात आला
याविषयी सविस्तर माहिती अशी की, इस्त्रो ने राष्ट्रीय अंतराळ दिन २०२४ साठी भारतीय अंतरीक्ष भू-स्थानिक डोमेन, अंतराळ विज्ञान, प्रतिमा प्रक्रिया आणि एआय/एमएल क्षेत्रातील १२ समस्या हॅकाथॉनसाठी निवडल्या आहेत. ज्यामध्ये जिओ-स्पेशियल ऍप्लिकेशन्सवर १२ समस्या विधाने आहेत. या समस्या सोडवण्यासाठी, नवीन संधी ओळखण्यासाठी , नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि स्पेस-आधारित ऍप्लिकेशन्समध्ये ऍप्लिकेशन-चालित इकोसिस्टम तयार करण्यासाठी इस्रोने भारतीय अंतरीक्ष हॅकाथॉन २०२४ नुकतीच आयोजित केली होती.
हॅकाथॉन च्या रचनेमुळे समाज आणि देश दोघांनाही फायदा होणार असून यामध्ये पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पीएचडी प्रोग्राममधील भारतीय विद्यार्थ्यांच्या संघांना हॅकाथॉनमध्ये सहभागी होता येते ज्यामध्ये प्रत्येक संघात एक टीम लीडर आणि इतर तीन विद्यार्थ्यांचासमावेशअसतो. या प्रतिष्ठित प्रतियोगितेत होण्यासाठी देशभरातून शेकडो इंजिनीरिंग कॉलेजेस मधून हजारो टिमनी दिलेल्या समस्यांना अनुसरून सॉफ्टवेअर प्रोग्राम्स सादर होते. त्यामधून इस्रोकडून प्रत्येक विषयाच्या ९ टीम ची निवड कठोर द्विस्तरीय स्क्रीनिंग प्रक्रियेद्वारे झाली होती.
यानंतर च्या फायनल राऊंड साठी ३ टीम निवडण्यासाठी इस्रो च्या शास्त्रज्ञानकडून टीम लीडर ची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आल्या. ज्यामध्ये लातुर येथील गुलबर्गा येथील केंद्र शासनाच्या ईएसआयसी मेडिकल कॉलजचे कुलगुरू डॉ. संतोषराव क्षीरसागर यांचा मुलगा चैतन्य क्षिरसागर ने त्याच्या सखोल ज्ञान, आत्मविश्वासयुक्त सादरीकरनाद्वारे त्याच्या प्रोजेक्ट ला आणि सूर्यकिरण टीम ला ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश मिळवून देण्यात यशस्वी ठरला. आता चैतन्य संतोष क्षीरसागर आणि त्याची सूर्यकिरण टीम याची दिनांक १३ व १४ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या ग्रँड फायनल मध्ये निवड झाली असून, पुण्याच्या पीसीसीओई इंजिनीरिंग कॉलेज ची ही टीम चैतन्य च्या नेतृत्वात देशभरातील नीट, आयआयटी यासारख्या नामांकित कॉलेजेस मधून आलेल्या टीम्स सोबत ग्रँड फिनाले मध्ये आपले प्रोजेक्ट्स सादर करेल. या यशाबद्दल चैतन्य क्षीरसागर याचा मनोरमा बंगला टेंबुर्णी रोड येथे पत्रकार विरेंद्र पवार यांच्या वतीने अभिनंदन करून यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बाबुराव पवार, प्रा.गोविंद शेळके, मनोरमा पवार, राहुल कावळे,जयश्री पवार, केतकी पाटील , सौरभ पाटील , आदित्य पवार, पत्रकार चंद्रकांत शिंदे, सलीम सय्यद , गोविंद काळे, बालाजी काळे आदींची उपस्थिती होती.
या निवडीबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
