अहमदपुरात संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पती – पत्नीचे पाचव्यांदा रक्तदान
अहमदपुरात संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पती - पत्नीचे पाचव्यांदा रक्तदान
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा आरक्षण चळवळीचे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस येथील सकल मराठा समाज बांधवांनी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला. यावेळी ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी २०१ जणांनी रक्तदान करत दादांचा वाढदिवस साजरा केला.
सकाळी सर्वप्रथम तालुक्यातील आराध्य दैवत श्री रोकडोबा देवस्थान परचंडा येथे महाअभिषेक करण्यात आला व तालुक्यातील सर्व गावांमध्ये आपापल्या ग्रामदेवतास अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक समाज बांधवांच्या दारी व बांधावर फळझाडांची लागवड करण्यात आली. त्यानंतर अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच अनावश्यक खर्च टाळत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ही यावेळी करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर दिवसभर अन्नछत्र चालू ठेवण्यात आले होते.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल २०१ युवकांनी रक्तदान करत आपल्या लाडक्या दादांचा वाढदिवस साजरा केला.
आरक्षण लढयाच्या आंदोलनामध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या या तालुक्यामध्ये दादांचा वाढदिवस लोक उपयोगी उपक्रमांनी साजरा करत आपले वेगळेपण जपले आहे.
तत्पूर्वी २९ जुलै रोजी दादांच्या समर्थनार्थ व शासनाच्या निषेधार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. या दरम्यानच तालुक्यामधील सबंध सकल मराठा समाज यांच्याशी चर्चा करत वाढदिवसानिमित्त वरील कार्यक्रम घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आल्या प्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यामधील सकल मराठा समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.
अहमदपूर चे पत्रकार विरेंद्र पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषदेच्या शिक्षिका जयश्री विरेंद्र पवार ( कदम ) यांनी रक्तदान केले. या उभयंताचे हे पाचवे रक्तदान होते. अशा सामाजिक कार्याचे बाळकडू मिळावे म्हणून त्यांनी त्यांचा मुलगा चि. आदित्य पवार ही दिवसभर रक्तदात्या रुग्णांना एनर्जी ड्रिंक व बिस्कीट ची सेवा पुरवत होता. मराठासंघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त या सामाजिक उपक्रमात या दापंत्यांनी खारीचा वाटा उचलला. तसेच यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांचे स्वीय्य सहाय्यक धनंजय जाधव यांनी ही यावेळी रक्तदान केले.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंदराव शेळके, प्रा. दत्ता गलाले जयराम पवार, प्रा. नाना कदम, प्रा. रोहीदास कदम , देवानंद मुळे, दापके मामा, मुकेश पाटील, सिद्धार्थ दापके तानाजी मोरे शैलेश जाधव, ॲड. आनंद जाधव , अरविंद दापके मामा, शिवाजी चोथवे, गजानन मेकले, बालाजी ढोबळे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
