उपविभागीय अधिकारी यांचे कडून पिक पहाणी

0
उपविभागीय अधिकारी यांचे कडून पिक पहाणी

उपविभागीय अधिकारी यांचे कडून पिक पहाणी

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील लोहारा येथे उदगीर चे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या कडून पिक पहाणी करण्यात आली.
उदगीर उपविभागात सोयाबीन, कापूस व ईतर पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्यामुळे शेतकरी किटकनाशके मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. असे शेतकऱ्यांनी गांवात भेट दिल्यानंतर सांगितले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी लोहारा येथे प्रत्यक्ष दयानंद सोनटक्के यांच्या शेतावर जाऊन भेट दिली, व पहाणी केली. सध्याचे ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे कृषी अधिकारी यांनी प्रत्येक गांवात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी आदेशित केले आहे. यावेळी सोबत गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका क्रीडा अधिकारी लोदगेकर, नायब तहसीलदार संदीप हाडगे, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, मंडळ अधिकारी पंडित जाधव तसेच लोहारा येथील तलाठी अंकुश वडगांवे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!